सांगोला(प्रतिनिधी) सांगोला तालुक्यासह आसपासच्या परिसरात अल्पावधीतच नावलौकिक मिळविलेल्या खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये राज्य शासकीय कर्मचार्यांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांसाठीही मोफत उपचार व शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती डॉ.परेश खंडागळे यांनी दिली.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या योजने अंतर्गत खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कडून विनामुल्य सेवा देण्यात आहे.रुग्णालयातील उपचार प्रति लाभार्थी व त्याच्या कुटुंबामधील ३ व्यक्तिंना सर्व आजारावर रुग्णालयात भरती व मोफत औषधोपचार करण्यात येणार आहेत. सदर योजनेअंतर्गत सर्व नोंदीत सक्रिय (जिवित) बांधकाम कामगार तसेच, त्यांच्या कुटुंबामधील पती अथवा पत्नी आणि प्रथम दोन आपत्ये ही लाभार्थी म्हणून गणण्यात येतील.
त्याचप्रमाणे खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सिझर, डिलिव्हरी, हर्निया, हायड्रोसिस, अपेंडिक्स, गर्भाशयाची पिशवी काढणे, डेंग्यु, मलेरीया, हृदयरोग, फुफ्फुसाचे, पोटाचे, मेंदुचे, किडनीचे आजार, अॅक्सिडेंट, फॅक्चर असे अनेक आजारांवर कॅशलेस सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
ज्यांनी अजून या सुविधेसाठी लागणारे कार्ड अजून तयार केलेले नाहीये त्यांनी त्वरीत खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला भेट द्यावी असे आवाहन डॉ.परेश खंडागळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9834674111, 8999611622 या दूरध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.


Post a Comment
0 Comments