जिल्हा परिषद शाळा माळवाडी (राऊतमळा) येथील विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी भरविला विविध भाज्यांचा व खाद्य पदार्थांच्या बाजार.... बाजारात साडेचार ते पाच हजार रुपयांहून अधिक उलाढाल...
सांगोला (प्रतिनिधी) भाजी घ्या, टॉमेटो घ्या, कोथिंबीर घ्या, कांदे घ्या’ कांदा, मुळा ,भाजी ..अवघी विठाई माझी असे संत सावता महाराज यांनी आपल्या अभंगाद्वारे म्हटले आहे त्याप्रमाणेच आज शनिवार दि.२१ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद शाळा माळवाडी सांगोला येथील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी बाजार भरविला होता या बाजारात साडेचार ते पाच हजार रुपयेची उलाढाल झाली आहे.
सांगोला शहरातील जिल्हा परिषद शाळा माळवाडी,राऊतमळा येथील शाळेच्या पटांगणावर चिमुकल्यांनी बाजार भरविला होता,निमित्त होते चिमुकल्यांनी भरवलेल्या आठवडी बाजाराचे. बालवयातच व्यवहारिक ज्ञान मिळावे, फळभाज्या, रानभाज्या, पालेभाज्यांची ओळख होण्यासाठी माळवाडी शाळेच्या प्रांगणात आठवडा बाजार भरविला होता. लहान मुलांनी बाजारात मेथी, शेपू, पालक, कोथिंबीर, कारले, वांगी, दोडके, गवार, व इतर भाज्यासह कवठ, बोरे व इतर फळे, खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. काही मुलांनी आणलेल्या भेळ, पाणीपुरी , कचोरी सह इतर विविध पदार्थांचा खवय्यांनी आनंद लुटला. बाजारात सकाळी ९ ते ११ दरम्यान राऊतमळा, फुलेनगर, माळवाडी येथील महिला व पालकांनी खरेदीचा आनंद घेतला.
जि.प.शाळा माळवाडीच्या शिक्षिका मीनाक्षी बाबर शिंदे ,अनिता एडगे मॅडम यांच्या प्रेरणेतून व विद्यार्थी व पालकांच्या सहभागातून हा आठवडा बाजार भरविला होता यांस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी माजी नगरसेवक विजय राऊत, आनंदा राऊत,नानासो राऊत, वैभव राऊत,विनोद राऊत, बिणू राऊत, शाळा समितीचे अध्यक्ष विश्वनाथ राऊत,उपाध्यक्ष चैतन्य गोडसे,स्वाती राऊत, मनीषा राऊत, उत्तम बनसोडे, श्रद्धा राऊत, शारदा राऊत, सविता नवले, पूजा बनसोडे,नंदा नवले, गौरी राऊत, सुनीता राऊत, संगीता राऊत,अमोल राऊत, अविनाश राऊत, सुमित राऊत, चंद्रकांत वाघमारे, बजरंग राऊत, चांगदेव राऊत, तानाजी राऊत यांच्यासह अनेक महिला व पालकांनी सहभाग घेतला.



Post a Comment
0 Comments