...२ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.....
सांगोला (क्राईम रिपोर्टर) सांगोला पोलीसांनी दुचाकी चोरीसह , चोरीच्या इतर दोन गुन्ह्याचा तपास करून आटपाडी तालुक्यातील पुरूष व तरुणी अशा दोघां आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याकडून दुचाकी व सोन्याचे दागिने असा २ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी सांगितले.
सुनिल शामराव गायकवाड रा. कडलास, ता. सांगोला यांची मोटार सायकल माउली हॉटेल मिरज रोड येथुन चोरी झाले बाबत अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल होता. याचा तपास करणेकामी पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथक नेमले होते, पोलीसांनी यां चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत असताना तात्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरी करणाऱ्या संशयीत इसमास ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली, याबाबत पोलीसांनी सुनिल मारुती मंडले वय २६ रा. पिंपरी खुर्द ता. आटपाडी सध्या रा., देवापूर ता. माण, जि.सातारा याचे नावे निष्पन्न करुन त्याच्याकडून मोटार सायकल ताब्यात घेतली, त्यानंतर पोलिसांनी सुनंदा लक्ष्मण गोडसे रा. लक्ष्मीनगर ता. सांगोला या महिलेस चारचाकी गाडीतून लक्ष्मीनगर येथे सोडतो असे म्हणून वाटेतच दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण व बोरमाळ काढून घेतली होती, हा गून्हाही सुनिल मंडले याने शुभांगी रामचंद्र बुधावले वय २६ रा. निंबवडे ता. आटपाडी हिच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले पोलिसांनी त्यांच्याकडून आठ ग्रॅम सोन्याचे गंठण व सात ग्रॅम सोन्याची बोरमाळ जप्त केली आहे, तसेच सांगोला शहरातील विनय कल्याण कांबळे रा. वासुद रोड, नरेंद्र नगर यांचे बंद घराचे कुलूप ,कोयडा तोडून त्यांचे घरातील रोख रक्कम तसेच ३ ग्रॅमचे सोन्याचे कानातील दोन टॉप्स जोड, ७ ग्रॅम वजनावे लहान मुलाचा कंबरेचा करदोडा आदींची चोरी झाली होती हा गुन्हाही आरोपी सुनिल मंडले याने केला असल्याबाबत कबुली देऊन सोन्याचे दागिने काढून दिले आहेत, अशाप्रकारे पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तीन गुन्ह्याची उकल करून त्याच्याकडून दुचाकी, सोन्याचे दागिने असा सुमारे २ लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे याबाबत पोलिसांनी सुनील मारुती मंडले वय २६ रा. पिंपरी खुर्द ता.आटपाडी सध्या रा.देवापूर ता.माण, जि. सातारा व शुभांगी रामचंद्र बुधावले वय २६ रा. निंबवडे,ता.आटपाडी यांना अटक केली आहे.यांचेकडुन जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक ग्रामीण अतुल कुलकर्णी, प्रितमकुमार .यावलकर अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोनि. भिमराव खणदाळे यांच्या मार्गदर्नाखाली पोना. बाबासाहेब पाटील, पोकॉ. लक्ष्मण वाघमोडे यांनी केला तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोहेकॉ.युसूफ पठाण यांनी मदत केली असल्याचे भीमराव खणदाळे यांनी सांगितले.

Post a Comment
0 Comments