Type Here to Get Search Results !

शेकापचे डॉ.बाबासाहेब देशमुख यांना 'प्रहार' संघटनेचा पाठिंबा

 शेकापचे डॉ.बाबासाहेब देशमुख यांना आ. बच्चू कडू यांच्या 'प्रहार' संघटनेचा पाठिंबा.


सांगोला (प्रतिनिधी):-

संपूर्ण राज्यभर दिव्यांग बांधवांचे दैवत म्हणून ओळख असलेल्या आ. ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार दिव्यांग क्रांती संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाने सांगोला विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हा समनव्यक नविद पठाण व तालुका अध्यक्ष सतीश दिडवाघ यांनी दिली.
  प्रहारच्या वतीने आ. बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर ' आसूड यात्रा ' काढण्यात आली होती, यावेळी  तत्कालीन आ. भाई गणपतराव देशमुख यांनी 'आसूड यात्रेचे' दिनांक १४ एप्रिल २०१७ मध्ये सांगोला शहरात स्वागत केले व सहकार्य केले होते, तसेच दिव्यांग कल्याण निधी नियंत्रण समिती नेमून प्रहारच्या कार्यकर्त्यांला संधी दिली म्हणून
दिव्यांग बांधवांच्या हितासाठी आणि वंचित घटकाला भविष्यात न्याय मिळावा, यासाठी सांगोला तालुका प्रहार कार्यकारिणीने शेकापचे उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा दिला आहे. तसेच सर्व दिव्यांग बांधव व प्रहार कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब देशमुख यांना मतदान करावे असे आवाहन प्रहारच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments