... प्रत्येक निवडणुकीत " नवा गडी नवे राज्य ;असे म्हणत तालुकाभर चमकोगिरी..
सांगोला (विशेष प्रतिनिधी) सांगोला मतदार संघात काँग्रेसला रसातळास नेण्यास कारणीभूत ठरलेल्या चमकोगिरी करणाऱ्या मास्तराने प्रत्येक निवडणुकीत आपल्या सोयीनुसार वेगवेगळी भूमिका असते हे प्राध्यापक काँग्रेसला प्रवाहाच्या विरुध्द दुसऱ्या पक्षाच्या दावणीला बांधत असल्याचे दिसून येत आहे मात्र या महाशयांचा अंदाज चुकला असून मतदारसंघातील "हवा का रूख बदल चुका है ; त्यामुळे त्याचे सुरू असलेले म्हातार चाळे लवकरच बंद होतील असे बोलले जाते आहे. चमकोगिरी करणाऱ्या या मास्तरने आपली कुवत बघून भाषणबाजी करावी , ते एका जाहीर सभेत म्हणाले तालुक्यात शेकापचे नामोनिशान राहिले नसते, तालुक्यातील पाण्यासाठी गणपतराव देशमुख यांनी काही केले नाही आणि अजून काही बरळले ...राजकारणात जर तर ला अर्थ नसतो, मास्तर आपली कुवत वॉर्डातील नगरसेवक निवडून आणण्याची नाही आणि तुम्ही शेकापला संपवायची वल्गना करीत आहात, व गणपतराव देशमुख यांच्यावर खोटे आरोप करीत आहात..हे वागणं बरं नव्हं... विधानसभेच्या निवडणुकीत प्रत्येक वेळी आपली निष्ठा खुंटीला टांगून व गॉडफादर बदलत या मास्तरने आपली भूमिका वेळेनुसार बदलली आहे, आणि हे महाशय जाहीर सभेत नैतिकतेच्या गप्पा मारीत आहेत लक्षात ठेवा मास्तर...अहो यां शेकापच्या अभेद्य तटबंदीला अनेकांनी सुपाऱ्या घेवून धडका दिल्या त्यात ते स्वतः रक्तबंबाळ झाले आणि तुम्ही किस झाडं की पत्ती...बात निकली तो बहुत दूर तक जाएगी, समझने वालो को इशारा काफी है...
हे प्राध्यापक स्वतःला गांधीवादी व काँग्रेसचे निष्ठावंत पदाधिकारी समजतात, पूर्व पुण्याईच्या जोरावर त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागेपुढे चमकोगिरी करीत आपली हयात घालवली तसेच जिल्हा व राज्य कार्यकारणीवर पदावर चिकटुन बसले,त्यांनी आपल्या शाळेतील व मर्जीतील गोतावळा असलेल्या लोकांची अनेक ठिकाणी मागच्या दरवाजाने वर्णी लावली, आता मात्र ते या गोतावळ्याच्या बाहेर पडत जाहीर सभेतून नैतिकतेचे धडे देत फिरत आहेत , सांगोला नगरपरिषदेत सत्ता कोणाचीही असो शहर विकासाच्या गोंडस नावावर गोंडा घोळत असतात. नगरपरिषद निवडणुकीत एकदा जोरदार आपटल्यावर ,प्रत्यक्ष निवडणूक नको रे बाबा असे म्हणतं गेली तीस वर्ष मागील दरवाजाने चंचू प्रवेश करतात, त्यांनी आपल्या शाळेस नगर परिषदेचा भूखंड नाममात्र भाडे करारावर काबीज केला असल्याची चर्चा आहे,, याच शाळेतील शिक्षकाकडून दर महिन्याला शाळा विकासाच्या नावावर काही ठराविक रक्कम कपात करण्यात येत असल्याचे बोलले जाते, असे असेल तर या शिक्षकांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा तळतळाट तुमच्या मागे आयुष्यभर पिच्छा सोडणार नाही याचा तुम्ही विचार कधी केला का.?. तसेच विद्यार्थ्याकडूनही तुम्ही जादा तासाच्या नावावर पैसे उकळत आहात असे विद्यार्थ्या तून बोलले जाते याबाबत पालकांच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत या पालकांना दमदाटी करून तुमच्या मुलाचा दाखला घेऊन जा असे उर्मट बोलून धमकवण्यात येत असल्याची चर्चा आहे,
अशीच एक घटना २०१० साली काळ्या रात्री शिक्षक घडविणाऱ्या शैक्षणिक संकुलात व संपूर्ण शैक्षणिक क्षेत्राला काळिंबा फासणारी घटना घडली होती हे प्रकरण राजकीय दबाव आणून थंड गुलदस्त्यात टाकण्यात हे महाशय यशस्वी झाले पण प्रकरण शेवटी अंगलट आलेच यात यां शाळेची व स्वतःची नाचक्की झाली होती,तरीही,," गिरे तोभी टांग उपर; करून वेळकाळ बघून सपशेल नांगी टाकणाऱ्या यां मास्तरांचा राजकिय किडा सध्या निवडणुकीत वळवळू लागला आहे, तो सध्या शेकापक्ष व त्यांच्या नेत्यांवर गरळ ओकत तालुकाभर फिरत आहे , आणि आपल्या शाळेतील शिक्षकांना त्यांची इच्छा नसतानाही आपण पाठिंबा दिलेल्या पक्षाची तळी उचलण्यास भाग पाडत आहे, ऐन निवडणुकीत शिक्षकांवर दबाव टाकून वेठीस धरल्याने शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी असल्याची चर्चा आहे "भोली सुरत दिलं के छोटे..असून "नाम बडे औंर दरशन खोटे,; अशी ख्याती मास्तरची आहे, त्यामुळे तालुक्यांतील सुजाण नागरिकांना यां मास्तराची थेरे चांगलीच माहित आहेत २३ तारखेनंतर हे महाशय मात्र " ऐसे कैसे हो गया ; असे बरळंत नमानिराळे राहणार हे मात्र निश्चित...

Post a Comment
0 Comments