कपडे बदलल्यासारखे नेते बदलत आहात त्यामुळे जनता आपल्या पाठीशी उभी आहे का याचे आत्मपरीक्षण करावे-बाबुराव गायकवाड
सांगोला (प्रतिनिधी):-तालुक्यातील दोन जणांनी काय केलं हे सर्वांना चांगले माहित आहे.साखर कारखान्याची वाट कोणी लावले ते सांगा असे म्हणत संस्था चालवण्याच्या आमच्यात हिंमत आहे.. विरोधकांनी संस्था काढून पिढी बरबाद करण्याचे काम करत आहात. समाजकारण करायचे असेल तर निरनिराळे चांगल्या संस्था उभ्या करा, शेतकऱ्यांच्या हिताचे राजकारण करा असे सांगत खऱ्याला खरे म्हणा लबाड्याच्या नादी लागू नका. कपडे बदलल्यासारखे नेते बदलत आहात त्यामुळे जनता आपल्या पाठीशी उभी आहे का असा सवाल उपस्थित करून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड यांनी केले
महुद येथे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर डॉक्टर बाबासाहेब देशमुख, डॉक्टर अनिकेत देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार, दत्ता सावंत यांच्यासह शेतकरी कामगार पक्ष व मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना अतुल पवार म्हणाले की, उजनी योजनेच्या पाईप आणले म्हणून तालुक्यात फटाके उडवता.. उजनीचे दोन एमसी पाणी दहा एमएम च्या पाईप मधून येत असते का असे सवाल उपस्थित करून काय बोलता..काय चालले हेच समजना. टेंभूच्या पाण्याचे काम चालू असताना उजनीचे सांगता लाजा वाटायला पाहिजेत अशी प्रस्थापितांवर जहरी टीका करत.लोकांची दिशाभूल करू नका असे आवाहन केले.येणाऱ्या कालावधीत तालुक्याचे विकासाचे काम करायचे आहे. गेल्या पाच वर्षात विकास कामांच्या नावाखाली नुसती डागडुजी केलेल्या कामे पुन्हा मजबूत करण्यासाठी डॉ. बाबासाहेब देशमुख यांना भरघोस मताने निवडून द्या असे आवाहन केले.
यावेळी बोलताना डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, आबासाहेबांनी तालुक्याच्या विकास करत असताना कोट्यावधींची विकास कामे आणली आणि ती चांगल्या पद्धतीने करूनही घेतले. ती कामे करून घेत असताना ठेकेदारांकडून कामानिमित्त आबासाहेबांनी चहा पिला असेल
असेल तर राजकारण सोडू. २३ तारखे नंतर तुमच्या केसालाही कोण धक्का लावणार नाही याची जबाबदारी मी आणि अनिकेतने घेतली आहे. महुद परिसरात गलाई बांधव व मोठे व्यापारी या ठिकाणी व्यापार करतात. टक्केवारी व हप्ता कुणाकडून घ्यावा हे समजत नाही. महूद सारख्या बाजारपेठेत हप्ता मागितला जातोय. किती खालच्या स्तराला यांचे राजकारण गेले आहे. याचा आता सर्वांना विचार करावा लागणार असून हे सर्व बंद करण्यासाठी शेकापच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहा असे आवाहन केले.
डॉ. अनिकेत देशमुख म्हणाले की, तुमच्याच नेत्यांनी आबासाहेबांच्या कार्याचे कौतुक केले आहे त्यामुळे टीका आमच्यापर्यंत मर्यादित असाव्यात. या पुढील काळात आबासाहेबांवर टीका केली तर ती तुम्हाला झेपणार नाही. तालुक्याला एका विनोदी चष्म्यातून बघितले जाते. झाडी डोंगर पुरता सांगोला तालुका मर्यादित राहिला आहे. लोकशाहीला कलंक लावण्याचे काम लोकप्रतिनिधींनी केले आहे.या सर्व बाबींचा विचार निश्चितच २० तारखेला केला जाईल आणि 23 तारखेला शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा या तालुक्यात पुन्हा एकदा डौलाने फडकवले असा विश्वास व्यक्त केला.
प्रारंभी महूद गावातून डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख यांची जंगी मिरवणूक करण्यात आली होती. यावेळी शेतकरी कामगार पक्ष व मित्र पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज पर्यंतच्या इतिहासातील महुद येथील सर्वात मोठी रॅली झाली असून महुद गटातून शेकापला निश्चित मताधिक्य मिळेल असा विश्वासही कार्यकर्त्यांमधून व्यक्त केला जात आहे.

Post a Comment
0 Comments