Type Here to Get Search Results !

*धनुष्यबाण काँग्रेस ,राष्ट्रवादीच्या लावणीला बांधला होता म्हणून आम्ही टांगा पलटी घोडे फरार केले - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे.




सांगोला (प्रतिनिधी) अडीच वर्षांपूर्वी आम्ही शहाजी बापूसोबत टांगा पलटी घोडे फरार केले कारण  त्यांनी बाळासाहेबांचे विचार विकले, नको त्याच्या सोबत युती केली निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने जो निकाल दिला होता त्याच्या विरुद्ध त्यांनी निर्णय घेतला होता ,धनुष्यबाण काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दावणीला बांधला म्हणून आम्ही उठाव केला त्यामुळे सांगोला तालुक्यांतील विकास कामासाठी साडेपाच हजार कोटी रुपयांचा निधी देवू शकलो,भविष्यकाळात तुमच्या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यासाठी व पुढील योजना राबविण्यासाठी शहाजीबापू पाटील यांना निवडून द्या असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ते काल गुरुवार दि.१५ नोव्हेंबर रोजी सांगोला येथे  आयोजित केलेल्या शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांच्या विराट प्रचार सभेत बोलत होते यावेळी व्यासपीठावर शहाजीबापू पाटील, रेखाताई पाटील, भाजपचे चेतनसिंह केदार, श्रीकांत देशमुख, आरपीआयचे खंडू सातपुते , शिवसेना तालुकाध्यक्ष दादासो लवटे यांच्यासह शिवसेनाचे पदाधिकारी व महायुतीचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        शिवसेनेचे उमेदवार शहीदबापू पाटील म्हणाले  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात अडीच वर्ष साधी आमदाराला भेट घेता येईना,त्यांनी मतदार संघासाठी एक रुपयाचा निधी त्यांनी दिला नाही खरंतर आम्ही उठाव केल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले व त्यांनी साडेपाच हजार कोटी रुपयांचा निधी दिला त्यामुळे मी आपल्या भागाचा विकास करू शकलो म्हणून मला पाच वर्षाचा नाही तर अडीच वर्षाचा आमदार म्हणा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळाली, मी मैदान सोडणारा व्यक्ती नाही आता तुम्ही मैदानात या, मी गुहाटीला गेलो नसतो तर तालुक्याचा विकास झाला नसता, उद्धव ठाकरे तुम्ही इथे आला परंतु विकासाचे न बोलता हातवारे करून कवायत करून गेलात, तुमच्या हवेतल्या भाषणाने माझ्या तालुक्यातील जनतेचे पोट भरणार नाही असा टोला लगावला तर  दीपकआबा साळुंखे पाटील यांच्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांच्या मी शिव्या खाल्ल्या तरीही त्यांना विकास कामातील निम्मा वाटा दिला ते मॅच फिक्सिंग करून निवडणूक लढवीत आहेत मी गणपतराव देशमुख यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली तुम्ही तर दोघे कालचे पोरं आहात असे सांगून  माझे देश पातळीवर झालेले नाव ठेवायचे की घालवायचे हे आता तुमच्या हातात असून तुमच्या भरोशावर माझा विजय निश्चित असल्याचे शहाजी बापू पाटील यांनी सांगितले.
पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तुमच्या मतदारसंघात बापूंच्या आग्रहास्तव आम्ही साडेपाच हजार कोटी रुपयांचा निधी दिला, येथे जमलेले सर्व माझे लाडके बंधू-भगिनी आहेत, शहाजीबापू रांगडा गडी आहे, काय ती भाषा काय ते डायलॉग सगळं काही ओके आहे, ते बोलायला लागले की भल्या भल्यांची विकेट घेतात, ते आपल्या टीमचे महेंद्रसिंह धोनी आहेत, प्रत्येक बॉल बॉर्डरच्या बाहेर,अरे ला कारे म्हणण्याची ताकद बापूमध्ये आहे, आजची गर्दी बघून मला सर्व ओके वाटत आहे, गेल्या वेळेपेक्षा जास्ती गुलाल आणि फटाके आताच आणून ठेवा, वीस तारखेला बापूंना छप्पर फाडके मते मिळणार आहेत, सोलापूर जिल्हा हा सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा आहे बापू यंदा साखर नक्की वाटणार,  बापूंनी गोहाटी, मुंबई व सांगोला ही जिंकला आहे, सांगोला तालुका कष्टकऱ्यांचा म्हणून  ओळखला जातो येथील डाळिंब प्रसिद्ध आहे, गेल्या दोन वर्षात तुमच्या तालुक्यातील परिस्थिती बदलली आहे, मतदारसंघाच्या विकासासाठी महाविकास आघाडीच्या  काळात भोपळा मिळाला पण त्यांना आम्ही मोठ्या प्रमाणात निधी दिला यातील निम्मा निधी शेतीच्या पाण्यासाठी दिला, अरे देण्यासाठी दानात लागते, अगोदरचे मुख्यमंत्री घेणारे होते महायुतीच्या काळात आम्ही साडेपाच हजार कोटी रुपयांचा निधी दिला, सिंचन योजनेसाठी ८८४ कोटी रुपये दिले, टेंभू ,म्हैसाळ निरा उजवा कालवा या योजनातून सांगोल्याला पाणी मिळणार आहे यासाठी निधी कमी पडू देणार नाही, बापू वाघासारखे असली तरी त्यांचं काळीज दयाळू आहे, आम्ही दोन वर्षांपूर्वी जो उठाव केला त्या मिशनमध्ये बापूंनी साथ दिली ,त्यांनी बाळासाहेबांचे विचार विकले, नको त्याच्या सोबत गेले  त्यामुळे शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेस, राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली आम्ही लाडकी बहीण योजना आणली त्यावर विरोधक लाडक्या बहिणींना लाच ,भीक देताय असे बोलू लागले काही दृष्ट ,कपटी भाऊ तर कोर्टात गेले त्यांना कोर्टाने चपराक लावली येणाऱ्या निवडणुकीत तुम्ही यां कपटी भावास याचा जाब विचारा, तुम्हाला या लाडक्या बहिणीच्या योजनेत खोडा घालणाऱ्या जोडा दाखवायचा आहे, विरोधक म्हणत आहेत आमचे सरकार आल्यानंतर तुम्हाला जेलमध्ये टाकू, पण जनतेच्या, शेतकऱ्यांच्या, बहिणीच्या भल्यासाठी आम्ही तयार आहे पण हा एकनाथ शिंदे तुमच्या पोकळ धमक्याला भीक घालणार नाही, आम्ही जे बोलतो ते करतो आम्ही वचननामा प्रसिद्ध केला आहे लाडकी बहीण योजना, ज्येष्ठ नागरिकांचे मानधन, शेतकरी सन्मान निधीचे पैसै वाढवणार आहोत, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, प्रत्येकाला रोटी कपडा और मकान देण्याचा प्रयत्न केला, जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवले आहेत, २५ लाख रोजगार देणार आहोत, महिलांचे सुरक्षेचे प्रश्न आग्रहक्काने सोडविणार आहोत, पंचवीस हजार महिला पोलीस भरती करणार आहोत, शेतकऱ्यांचे विज बील माफ करणार, येणाऱ्या काळात वीज बिलात ३० टक्के सवलत देणार आहोत, सरकार स्थापन केल्यानंतर २०२९ व्हीजन जाहीर करणार आहोत आता प्रथम महायुतीचे सरकार आणायचे आहे  आम्ही महात्मा फुले आरोग्य योजनेतून एक लाख लोकांचे जीव वाचवले आहेत,आतापर्यंत घेणारा माणूस खुर्चीवर बसला होता आता देणारा माणूस बसला आहे त्यामुळे मला खात्री आहे येत्या २३ तारखे ला शहाजी बापू निश्चित निवडून येतील असे सांगितले.

Post a Comment

0 Comments