Type Here to Get Search Results !

"जैसे ज्याचे कर्म ... तैसे फळ देतो रे ईश्वर ;

 नवखे डॉ.बाबासाहेब देशमुख व आजी, माजी आमदारात निकराची लढाई...




सांगोला (विशेष प्रतिनिधी)
सांगोला विधानसभा मतदारसंघात विद्यमान आम. शहाजीबापू पाटील, माजी आम. कै.काकासाहेब साळुंखे यांचे सुपुत्र मा. आ.दीपकआबा साळुंखे पाटील व दिवंगत माजी आम.लोकनेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यात तिरंगी लढत होत असून शेवटच्या चार-पाच दिवसात मतदार संघातील वारे वेगळ्याच दिशेने वाहतांना दिसून येत आहे यां निवडणुकीत दोन कसलेल्या राजकीय पैलवानात शेवटच्या क्षणी नुरा कुस्ती होणार की राजकारणातील नवखा डॉक्टर उमेदवार बिन टाक्याची शस्त्रक्रिया करणार  हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
           सांगोला मतदार संघात सध्या विधानसभेचे पडघम मोठ्या प्रमाणात वाजत आहेत. शेवटचे चार-पाच दिवस प्रचारासाठी शिल्लक आहेत राज्यातील महाविकास आघाडीतील दोन घटक पक्ष निवडणुकीत एकमेकांसमोर आव्हान प्रती आव्हान देत आहेत तसे बघायला गेले तर १९६२ पासून हा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे असे असताना या मतदारसंघात (शहाजीबापू काँग्रेसकडून १९९५ लां प्रथम निवडून आले तर २०१९ ला शिवसेनेच्या चिन्हावर दुसऱ्यांदा निवडून आले ) २०१९ ला झालेल्या निवडणुकीत फक्त एकदा तेही  काठावर शिवसेनेचा उमेदवार निवडून आला या मिळालेल्या विजयाचा दावा करीत शिवसेनेने आडमुठी भूमिका घेतल्याने व स्वतःच्या ताकदीचा विचार न करता आयात उमेदवास प्रवेश देऊन महाविकास आघाडीचा विचार न करता परस्पर उमेदवारी जाहीर केली, तर  महाविकास आघाडीत जागा शेकापला सोडण्याचे निश्चित झाले, शेकापच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, कम्युनिस्ट पार्टी, प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी,राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना, रासप, एमआयएम,प्रहार संघटना, महाविकास आघाडीतील मित्रपक्ष सह इतर पक्षांनी पाठिंबा दिला आहे, तर एकेकाळी या मतदारसंघात बलाढ्य असलेल्या परंतु सध्या मरणासन्न अवस्थेत असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने वेगळा मार्ग अवलंबत शिवसेना उबाठा उमेदवारास पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत पडलेली फुट शेकापच्या पथ्यावर पडली आहे असे राजकीय जाणकाराकडून बोलले जात आहे.
...पिंजऱ्यातील पोपटपंची.सध्या काँग्रेसच्या एका नेत्याकडून स्वतः गांधीवादी विचारसरणीचा डांगोरा पिटत  व स्वतःला शिक्षण सम्राट म्हणवून घेणारे सांगोला शहरातील एक प्राध्यापक दिवंगत आ.गणपतराव देशमुख व शेतकरी कामगार पक्षावर राजकीय चिखलफेक करीत असल्याचे दिसून येते, या गांधीवादी पिंजऱ्यातील (पोपट) मास्तरांना नगराध्यक्ष होताना तसेच स्वीकृत नगरसेवक होताना व इतर अनेक भानगडीत आबासाहेबांनी भरभरून सहकार्य केले असल्याची चर्चा आहे ,याची जाणीव न ठेवता ,माझ्या रक्तारक्तात काँग्रेस आहे असे म्हणणारे व स्वतः अडचणीत असताना कातडी बचाव धोरण अवलंबणारे हेच संधीसाधू मास्तर सध्या जाहीर सभातून नैतिकतेच्या गप्पा मारीत  फिरत असताना दिसत आहेत परंतु सांगोल्यातील सुज्ञ जनतेस खरे खोटे चांगलेच माहित आहे, सांगोला मतदारसंघात एकेकाळी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष होता, आमच्या घराण्याची परंपरा गांधीवादी व काँग्रेस विचाराची आहे अशी पोपटपंची करणाऱ्या पिंजऱ्यातील पोपटाने  काँग्रेसच्या राज्य कार्यकारणीवर निवड होऊनही सांगोला मतदार संघातील काँग्रेसचे अस्तित्व नाहीसे केले व काँग्रेसचे मतदार संघातील नामोनिशान नष्ट झाले यास जबाबदार कोण अशीही चर्चा सुरू आहे.
सांगोला मतदारसंघात जे शेकापला विरोध करीत आहेत व नैतिकतेच्या गप्पा मारीत आहेत त्या सर्वांना दिवंगत गणपतराव देशमुख यांनी कुवत नसताना पदे दिली असून त्यांना त्याचा विसर पडला असल्याचे बोलले जाते  हे सर्व सध्या विरोधातील तथाकथीत नेते आपल्या नावाच्या मागे पुढे जी आजी, माजी म्हणून जी पदांची बिरुदावली लावत आहेत ती लोकनेते गणपतराव देशमुख यांची देणं आहे त्यामूळे यां तथाकथित नेत्यांनी आत्मपरीक्षण जरूर करावे या तथाकथित नेत्यांनी विरोध जरूर करावा परंतु खाल्ल्या मीठाला थोडे तरी जागावे असे दबक्या आवाजात बोलले जात आहे.

Post a Comment

0 Comments