Type Here to Get Search Results !

आमदार शहाजीबापू पाटील यांचा सकल जैन समाज बांधवांच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद ;


सकल जैन समाज बांधवांनी मानले आ.शहाजीबापूंचे आभार..



सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुक्यातील लोकप्रिय कार्यतत्पर आमदार शहाजीबापू पाटील यांच्याकडे सांगोला शहरातील सकल जैन समाज बांधवांनी  जैन मंदिर ,त्यागी निवास व सांस्कृतिक हॉलकरिता निवेदनाद्वारे निधीची मागणी केली आहे. सांगोला शहरात सकल जैन समाज बांधवांची स्वतःच्या मालकीची जागा असून त्या जागेवरती जैन समाजासाठी विविध प्रकारच्या सोयी निर्माण करण्यासाठी व बांधकामासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांना संपर्क कार्यालयामध्ये भेटून  निवेदनाद्वारे निधीची मागणी केली आहे . जैन समाजाच्या या मागणीचा विचार करून आमदार शहाजीबापू पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत मुख्यमंत्री निधीतून सांगोला तालुक्यातील जैन समाजासाठी निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले आहे.
          सांगोला शहरात जैन समाज बांधवांची स्वतःच्या मालकीची जागा असून या जागेवर जैन मंदिर, त्यागी निवास व संस्कृतीक हॉल बांधकामासाठी आमदार शहाजीबापू पाटील त्यांच्याकडे निवेदनाद्वारे निधीची मागणी केली असून या कामासाठी   लवकरच निधी उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले . आमदार शहाजीबापू पाटील यांच्या आश्वासनामुळे सकल जैन समाज बांधवांनी त्यांचे आभार मानत आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून कायमस्वरूपी साथ देऊ  असे आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments