Type Here to Get Search Results !

गावडेवाडी( हंगिरगे ) ता.सांगोला गावातील, शेकाप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

 आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते कार्यकर्त्यांचे स्वागत



सांगोला (प्रतिनिधी)  सांगोला तालुक्यातील गावडेवाडी (हंगिरगे) गावातील कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षातून शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार व स्वागत करण्यात आले. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्ते बिरुदेव गावडे, अशोक गावडे, बाळू गावडे, विनायक गावडे, शिवाजी गावडे, नामदेव गावडे, विकास चव्हाण, भारत गावडे, तानाजी गावडे, यशवंत गावडे यांचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी स्वागत केले. याप्रसंगी तालुका प्रमुख दादासाहेब लवटे, मा.नगरसेवक प्रा. संजय देशमुख , मान्यवर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते . 

सांगोला तालुक्यातील गावडेवाडी( हंगिरगे ) गावातील शेकाप कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे निश्चितपणे तालुक्यातील शिवसेनेची ताकद वाढणार आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांनी शेकाप मधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करून कार्यकर्त्यांना बळ देण्याचा विश्वास व्यक्त केला व कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.


Post a Comment

0 Comments