Type Here to Get Search Results !

*शेतकऱ्याच्या शेतातील १ हजार झाडावरील पेरुची चोरी...नरळेवाडी ता.सांगोला येथील घटना...*




सांगोला (प्रतिनिधी) अज्ञात चोरट्यानी सव्वा लाख रुपये किंमतीचे
सुमारे दीड ते दोन टन पेरु रात्रीच्या सुमारास चोरुन नेल्याची घटना रविवार दि.२९ सप्टेंबर रोजी नरळेवाडी ता. सांगोला येथे उघडकीस आली आहे.
याबाबत अण्णासाहेब आप्पाराव शिंदे रा.नरळेवाडी ता.सांगोला यांनी सांगोला पोलिसांत लेखी तक्रार अर्ज दिला आहे.
        नरळेवाडी ता.सांगोला येथील अण्णासाहेब शिंदे या तरुणाने वडिलोपार्जित शेती गट नं २१५/१ मधील  शेतीची मशागत करून शेतीची सुधारणा केली. शेतीत फळबाग इतर पिकासोबत दीड वर्षापूर्वी तैवान जातीच्या पेरूची सुमारे १ हजार झाडांची लागवड केली. गेली दीड वर्षापासून त्यांनी लाखो रुपयेची रासायनिक खते, महागडी औषधे फवारणी करून मोठ्या कष्टाने बाग जोपासल्याने पेरूची झाडे फळांनी लकडलेली होती.त्यामुळे अण्णासाहेब शिंदे हे  पेरुच्या विक्रीसाठी व्यापाऱ्याच्या शोधात होते दरम्यान शनिवारी रात्री त्यांनी व्यापाऱ्यासोबत पेरूचा सौदा ठरवून प्रति किलो ६० रुपये दराने पेरूची विक्री केली होती दरम्यान रविवारी सकाळी व्यापाऱ्यासोबत आण्णासाहेब शिंदे बागेत गेले  असता झाडाला पेरू नसल्याचे पाहून व्यापाऱ्यांने तुम्ही तर मला झाडाला पेरुचा माल भरपूर आहे, जास्त बॉक्स घेऊन या म्हणून बोलला होता. बागेत तर झाडाला पेरुचे फळच दिसत नाही असे म्हणताच शेतकरी अण्णासाहेब शिंदे यांनी पेरु झाडांची आजूबाजूला पाहणी करीत संपूर्ण बागेची फेरफटका मारला असता झाडांवरील सुमारे दीड ते दोन टन पेरूचा माल गायब असल्याचे त्याच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना धक्काच बसला. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात शेतकऱ्यांकडे रात्री बागेत कोणी आले होते का  ? याबाबत चौकशी केली असता काहीच माहिती मिळाली नाही.याबाबत अण्णासाहेब आप्पाराव शिंदे - नरळेवाडी या शेतकऱ्यांनी सांगोला पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली आहे.





Post a Comment

0 Comments