Type Here to Get Search Results !

*सांगोला मतदारसंघातील सर्वच विकास कामात भ्रष्टाचार तर आमदारांनी टक्केवारी साठी ठेकेदार जोपासले...

 


... शेतकरी कामगार पक्षास सक्षम विरोधकांची भूमिका पार पाडता आली नाही.... शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे..*


सांगोला (प्रतिनिधी) सांगोला मतदारसंघात विकासकामाच्या नावावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे,तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात मासिक पैसै घेतले जात आहेत जनतेचा विकास होण्याऐवजी आलेल्या शासकीय निधीतून मर्जीतील ठेकेदारास कामे देऊन टक्केवारी घेतल्याने कामेही निकृष्ट दर्जाची होत आहेत,दुसरीकडे शेकापने सक्षम विरोधक म्हणून यावर भूमिका न घेतल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत गद्दार आमदाराला गाडण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा उमेदवार पूर्ण ताकतीने सांगोला मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचे जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे यांनी सांगोला येथे सोमवार दि.९ सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले यावेळी सूर्यकांत घाडगे, अरविंद पाटील,कमरुद्दीन खतीब, तुषार इंगळे, सौरभ केदार यांच्यासह शिवसेना पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

     पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने तालुक्यात  शिवसेना सदस्य नोंदणी अभियान जोमाने सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवारास अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही, भाळवणी गटात सर्व गावातून महा विकास आघाडीचा उमेदवार लिडवर आहे परंतु सांगोला तालुक्यात लीड नाही याचे आत्मपरीक्षण सर्वांनी करावे  महाविकास आघाडीचे नेते गाफील राहिले,विद्यमान गद्दार आमदारास निवडूण आणण्यासाठी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगोला येथे जाहीर सभा घेतली त्यामुळे ते निवडून आले निवडूण आल्यावर मातोश्रीवर उध्दव ठाकरे साहेब मी तुमच्यामुळे निवडूण आलो,तुमचे  उपकार मी मरे पर्यंत विसरणार नाही असे सांगीतले होते उद्धव ठाकरे यांनी सांगोला मतदारसंघासाठी ३५० कोटी रुपयांचा निधी दिला असतानाही अडीच वर्षापूर्वी यां गद्दार आमदाराने मला निधी मिळाला नाही म्हणून रातोरात गद्दारी केली तालुक्यात विकासकामांच्या नावावर मर्जीतील ठेकेदाराना कामे देऊन त्यांच्याकडून कोट्यावधी रुपये टक्केवारी घेतले जात आहे हे सर्व जनतेला माहीत आहे  ठेकेदाराकडून टक्केवारी घेतल्याने सर्वच विकासकामे निकृष्ट दर्जाची सुरू आहेत असे सांगून संभाजी शिंदे यांनी यां गद्दार आमदाराच्या कार्यकाळात अधिकाऱ्याकडून बदलीसाठी लाखो रुपये घेतले जातात तसेच तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांकडून मासिक वसुली करून लूट केली जात आहे आमदार व त्यांच्या बगलबच्चांचे विकासाच्या नावावर स्वतःची चोंबडी भरण्याचे काम सुरू आहे  तालुक्यातील सर्व विकास कामाच्या योजनात भ्रष्टाचार आहे एकंदरीत ५ वर्षात जी कामे केली ती टक्केवारी साठीच केली आहेत. विकास कामात भ्रष्टाचार सुरू असताना तालुक्यातील विरोधी शेकापने विरोधी पक्षांची भूमिका निभावली नाही,सध्याच्या शेकाप नेतृत्वात भाई गणपतराव देशमुख यांच्या सारखा वचक नाही त्यामुळे विकास कामात भ्रष्टाचार सुरू असताना शेकापने सांगोल्यात जागल्याची भूमिका घेतली नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार पूर्ण ताकतीने लढविणार आहे यासाठी महाविकास आघाडीचे खा. शरद पवार,काँग्रेसचे नाना पटोले व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संभाजीराजे शिंदे यांनी सांगितले.यावेळी उपजिल्हा प्रमुख सूर्यकांत घाडगे, अरविंद पाटील, तुषार इंगळे यांनी येणारी विधानसभा निवडणूक पक्ष देईल तो उमेदवार निवडूण आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.





Post a Comment

0 Comments