Type Here to Get Search Results !

*कडलास रोड ते सांगोला महाविद्यालय दरम्यान त्वरित गतिरोधक बसवावेत - डॉ.परेश खंडागळे*




सांगोला (प्रतिनिधी) सांगोला शहरातील कडलास चौक ते सांगोला महाविद्यालया दरम्यान गतिरोधक बसवावेत अशी मागणी
भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आधाडीचे माढा जिल्हाप्रमुख डॉ.परेश खडागळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
          सांगोला शहरातील कडलास रोड वरून जवळा, घेरडी तसेच कडलास वरून लोणविरे,सोनंद , डोंगरगाव, शेगाव व जत या महामार्गावर जड तसेच इतर वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे या रस्त्यावरच शहरातील अनेक नामवंत रुग्णालये असून बहूसंख्येने रु्णांची देखील वर्दळ असते तर पुढे महाविद्यालय व इंजिनिअरिंग कॉलेज असल्याने हजारो विद्यार्थी या रस्त्यावरून येजा करीत असतात सार्वजनिक बांधकाम खात्याने हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा केल्याने अनेक वाहनधारक सुसाट वेगाने वाहने चालवितात त्यामुळे रस्त्यावर अनेक वेळा छोटे मोठे अपघात होऊन अनेक जण दगावले आहेत तर काही जणांना कायमचे अपंगत्व आले आहे सध्याही या महामार्गावर दररोज एक तरी अपघात होतोच त्यामुळे संबंधितांनी त्याकडे लक्ष देऊन कडलास चौक , खंडागळे हॉस्पिटल समोर व सांगोला महाविद्यालय अशा तीन ठिकाणी गतिरोधक करणे गरजेचे आहे या मागणीसाठी तहसीलदार, पोलीस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपरिषद तसेच एसटी आगारप्रमुख यांना निवेदन दिले आहे तरी त्याची दखल घेऊन लवकरात लवकर गतिरोधक बसवावेत अशी मागणी डॉ.परेश खंडागळे यांनी केली आहे. 

Post a Comment

0 Comments