सांगोला (तालुका प्रतिनिधी) तु शाळेतील मुलांची भांडणे का सोडवली असे न्हणून सह शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकास शाळेच्या मीटिंग मधे मारहाण, शिवीगाळ करून लोखंडी टेबल उचलून डोकीत घालून जखमी करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याची घटना गुरूवार दि.१८ रोजी आलेगाव ता. सांगोला येथील आश्रम शाळेत घडली आहे. हणमंत रामचंद्र राऊल वय-४५ रा. आलेगाव ता. सांगोला हे सहशिक्षक म्हणून आलेगाव ता.सांगोला येथील आश्रम शाळेत नोकरीत आहेत या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून संजीव निवृत्ती बाबर.सह शिक्षक ज्ञानेश्वर शामराव शिंदे,देवीदास भानुदास दीघे,दामाजी आसबे,सुनिल रणदिवे, सचिन गावडे, शिपाईं सिताराम हणमंत लवटे व तुकाराम कोडग असे कर्मचारी आहेत शाळेचे संस्थापक प्रकाश बाबर हे काम पाहतात मंगळवार दि.१६ रोजी दुपारी १ वा.चे सुमारास मुख्याध्यापक संजय बाबर यांनी मुलांच्या अडीअडचणीसाठी शाळेत मिंटींग बोलवली होती.मिंटींग संपल्यानंतर फिर्यादी हनुमंत राऊत हे ऑफीसच्या बाहेर येत असताना सह शिक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी तु शाळेतील मुलांची भांडणे का सोडवली असे न्हणून चप्पल घेवून अंगावर धाबून आला होता त्यावेळी ही भांडणे मुख्याध्यापक संजय बाबर यांनी सोडवली होती. सदर घटनेबाबत फिर्यादीने शाळेचे अध्यक्ष प्रकाश बाबर यांना कळवले होते दरम्यान काल गुरुवार दि १८ रोजी दुपारी १२ वा.चे सुमारास शाळेचे अध्यक्ष प्रकाश बाबर यांनी वरील संदर्भात शिक्षकांची मिंटींग बोलवली होती सदर मिंटींग चालू असताना सर्व शिक्षकांना झाले प्रकाराबाबत विचारत असताना अचानक सहशिक्षक ज़ानेश्वर शिंदे याने फिर्यादी हनुमंत राऊत यांना सर्वांसमोर ऑफीसमध्ये गच्चीला धरले असता फिर्यादी राऊत हे घाबरून ऑंफीसच्या बाहेर आल्यावर ज्ञानेश्वर शिंदे याने ऑफीस मधील लोखंडी टेबल उचलून फिर्यादी हनुमंत राऊत यांच्या डोकीत घातला व जखमी अवस्थेत राऊत यांना चप्पलने मारहाण,शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याची घटना घडली आहे याबाबत हनुमंत राऊत यांनी ज्ञानेश्वर शामराव शिंदे रा.भाळवणी ता.मंगळवेढा या सहशिक्षिका विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
*शाळेतील मीटिंगमध्ये शिक्षकाने शिक्षकाच्या डोक्यात टेबल घातल्याने शिक्षक जखमी... आलेगाव ता. सांगोला येथील आश्रमशाळेत घडलेली घटना...*
July 18, 2024
0

Tags

Post a Comment
0 Comments