Type Here to Get Search Results !

महुद ता.सांगोला येथील हत्या प्रकरणातील सूत्रधारावर कठोर कारवाई करावी.. खा. धैर्यशील मोहिते पाटील.*



सांगोला (तालुका प्रतिनिधी) महूद व परिसरामध्ये आपली कायमस्वरूपी दहशत निर्माण करण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांची निर्घुण हत्या करण्यात आली आहे.या हत्या प्रकरणातील सूत्रधारांसह सर्वांवर कठोर कारवाई करुन महूद येथील गावगुंडांची दहशत पोलीस प्रशासनाने मोडून काढावी अशी मागणी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केली.
       सुनील कांबळे यांची गुरुवार ११  रोजी निर्घुण हत्या झाली.त्यांच्या कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे महूद येथे आले होते. त्यांचे समवेत पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख उपस्थित होते.उपस्थित नागरिकांनी या प्रकरणाचा सर्व घटनाक्रम खा. मोहिते-पाटील यांच्यासमोर मांडला.यावेळी बोलताना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले की,येथील दहशत मोडून काढण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे.यासाठी आपण आग्रही राहून या प्रकरणाचा पाठपुरावा करू.या प्रकरणातील सर्व आरोपींना कठोर शासन झाले पाहिजे.यासाठी जनतेने शांतता पाळावी. 
पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले की, या हत्या प्रकरणास जवळपास आठवडा होत आला आहे.मात्र या प्रकरणाचा योग्य तपास होत नाही.पोलिसांच्या तपासाबाबत येथील नागरिक समाधानी नाहीत.या तपासामध्ये कोणीतरी अडथळा निर्माण करतो आहे,अशी शंका उपस्थित केली जात आहे.घटना घडल्यानंतर या तपासात असलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे सी.डी.आर.तपासण्यात येऊन ते ग्रामस्थांसमोर ठेवण्यात यावेत.यावरून तालुक्यातील कोणत्या नेत्याने पोलिसांना फोन करून तपासात अडथळा निर्माण केला हे निष्पन्न होईल.शिवाय पोलिसांनी पकडलेल्या गुन्हेगारांचे फोन लोकेशन आणि फोन कॉल तपासले तर या खूनाच्या सूत्रधारापर्यंत ताबडतोब पोहोचता येईल.मात्र पोलीस याबाबत कोणतेही काम करत नसल्याने नागरिकांच्या मनातील संशय वाढत चालला आहे.येथील कांबळे कुटुंबीयांना व ग्रामस्थांना न्याय मिळाला पाहिजे.पोलिसांकडून न्याय मिळाला नाही,तर येथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल.त्यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील.यावेळी दामू साठे,अभिषेक कांबळे,कल्याण लुबाळ,अंकुश येडगे, दौलत कांबळे,जितेंद्र बाजारे,विजय कांबळे, वैभव कांबळे,शंकर पाटील,अशोक येडगे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट -मुलांच्या शिक्षणाची व मुलीच्या  लग्नाची जबाबदारी घेतली 

सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांचे पश्चात मुलगा व मुलगी आहे.या गरीब कुटुंबातील मुलाच्या व मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी मी व खा. धैर्यशील मोहिते-पाटील घेत आहोत. तसेच मुलीच्या लग्नाची जबाबदारी आम्ही घेत आहोत.- डॉ.बाबासाहेब देशमुख
*रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष व सांगोला नगरपरिषदेचे माजी नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांच्याकडून सुनील कांबळे यांच्या कुटुंबाचे सांत्वन करून त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून रोख २५ हजार रुपये आर्थिक मदत करण्यात आली .

Post a Comment

0 Comments