Type Here to Get Search Results !

आ.शहाजीबापूंच्या हस्ते सांगोल्यात दोन विकासकामांचे भूमिपूजन

*सांगोला-वासुद रस्त्याच्या कामांसह आठवडा बाजारात होणार मटन मार्केटची इमारत*


सांगोला (तालुका प्रतिनिधी): पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मंजूर निधीमधून ५ कोटी ५० लाख रुपये खर्चाच्या सांगोला-वासुद रस्ता रुंदीकरणाच्या कामाचा व सांगोला आठवडा बाजार मटन मार्केट फेज २ या १ कोटी ४५ लाख रु. मंजूर निधी कामाचा भूमिपूजन सोहळा

शनिवार २० जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता आठवडा बाजार व वासूद चौक या ठिकाणी होणार आहे. या विकासकामांचे भूमिपूजन आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते आणि माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
       सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी गेल्या पाच वर्षांत विकास कामांचा धडाका लावला असून जवळपास साडेचार हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. सांगोला ते वासुद रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असून या कामासाठी ५ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तसेच सांगोला आठवडा बाजारातील मटन मार्केट फेज २ या विकासकामांसाठी १ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. शनिवार २० जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता आठवडा बाजार व वासूद चौक या ठिकाणी दोन्ही विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते आणि माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या विकास कामांचे भूमिपूजन होणार आहे. यावेळी शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, माजी नगराध्यक्षा राणीताई माने, शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष तानाजीकाका पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मधुकर बनसोडे, भाजपचे तालुकाध्यक्ष अतुल पवार, माजी गटनेते आनंदा माने, माजी गटनेते सोमनाथ लोखंडे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments