या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी बी आर माळी यांनी गैरहजर अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे जे अधिकारी अनुपस्थित राहिलेत व ज्यांनी जाणून बुजून निवडणूक कामात टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आले आहे त्यांचेवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे
निवडणुकीचे कामकाज हे कालमर्यादित असून ते वेळेवर पार पाडणे आवश्यक आहे तरी कर्मचारी गैरहजर राहिले आहेत , ही बाब गंभीर असून ही कृती निवडणूकी सारख्या कामात अडथळा निर्माण करणारी आहे ,त्यामुळे लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ अन्वये तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (शिक्षा व अपील) १९७९ मधील तरतुदीनुसार कारवाई का करण्यात येऊ नये असा ईशारा निवडणूक निर्णय अधिकारी बी आर माळी जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ तथा उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांनी दिला असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत तथा तहसीलदार सांगोला यांनी सांगितले आहे

Post a Comment
0 Comments