*कडलास गटातील संपर्क कार्यालयाचा शुभारंभ संपन्न...*
सांगोला (प्रतिनिधी) : केंद्रात भाजपचे सरकार आहे तर राज्यात भाजप- शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महायुतीचे सरकार सत्तेत आहे. गावचा, तालुक्याचा व जिल्ह्याचा कारभार चांगल्या पद्धतीने चालावा यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची निर्मिती झाली. स्थानिक पातळीवर विकासाच्या दृष्टिकोन समोर ठेवून कडलास जिल्हा परिषद गटातून शोभाताई खटकाळे व कडलास पंचायत समिती गणातून राणीताई पाटील हे सक्षम उमेदवार दिले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला ऐतिहासिक यश मिळाले. याच धर्तीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेच्या उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळावे यादृष्टीने सर्वांनी आजपासून कामाला लागावे असे आवाहन करीत माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ सिद्धनाथ मंदिरामध्ये नारळ फोडून करण्यात आला. सिद्धनाथाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असून या निवडणुकीत आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून उमेदवारांना या बहुमताने विजयी करावे असे आवाहन माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी अकोला येथे उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यप्रसंगी केले.
पुढे बोलताना शहाजीबापू पाटील म्हणाले, २०१६ मध्ये मी शिवसेनेत प्रवेश केला .त्यानंतर तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकार मध्ये आम्ही सामील झाल्यानंतर तालुक्यातील विकासाला मोठ्या प्रमाणात गती आली व तालुक्याचा चौफेर व सर्वांगीण विकास करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मिळाला. कोणत्याही निवडणुकीत सत्तेबरोबर राहिल्यास निश्चितपणे प्रगती व विकास साधता येतो. कडलास गटात व गणात दोन्ही उमेदवार शिवसेनेचे आहेत .सर्वांनी नगरपालिकेमध्ये ज्याप्रमाणे माझ्यावरती प्रेम केले त्याप्रमाणे या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही पुन्हा एकदा असेच प्रेम दाखवावे. तालुक्यातील भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी आजपासूनच सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन शहाजीबापू पाटील यांनी प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी केले. यावेळी युवानेते योगेशदादा खटकाळे म्हणाले, यापूर्वीच्या निवडणुकीत मी दुसऱ्या पक्षात होतो. सध्या मी माजी आम.शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत काम करत असून कडलास जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या उमेदवार मातोश्री. शोभाताई खटकाळे व पंचायत समिती गणाच्या उमेदवार राणीताई पाटील यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. बापूंचा शब्द अंतिम मानून शिवसेनेमध्ये निश्चितपणे चांगल्या प्रकारे काम करेन असा ठाम विश्वास व्यक्त केला.
यावेळी चेअरमन अनिल खटकाळे यांनी सांगितले की, कडलास जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून उभारलेल्या उमेदवारांना गावातून चांगले मताधिक्य देण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखवावी. भविष्यातील गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र राहिल्यास निश्चितपणे चांगले दिवस पाहायला मिळतील असे सांगत दोन्ही उमेदवारांना अधिकाधिक मताधिक्याने विजयी करण्याची विनंती केली.
प्रचाराच्या शुभारंभासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकभाऊ शिंदे,सरपंच धनश्री गव्हाणे, उपसरपंच महादेव शिंदे, उद्योगपती बाळासाहेब आसबे, युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख सागरदादा पाटील, उद्योगपती सौदागर केदार, आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ व महिला भगिनी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments