*आबासाहेबांची चळवळ अजूनही जिवंत आहे हे दाखवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना प्रचंड मताने विजयी करा मा.खा. राजू शेट्टी *
सांगोला(प्रतिनिधी) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सांगोला तालुक्यात शेकापला जाहीर पाठींबा देत धंदेवाईक राजकारणांनी जो उच्छांद मांडला, जो पैशांचा बाजार मांडला आहे. त्याला मूठमाती द्या आणि अजूनही आबासाहेबांची चळवळ जिवंत सांगोला तालुक्यात जिवंत आहे हे दाखवून देत चळवळीचे नाते जपण्यासाठी डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या' शिट्टी ;,या चिन्हावर मतदान करुन निवडून द्यावे, असे आवाहन केले आहे यावेळी शेकाप नेते डॉ.अनिकेत देशमुख यांनी राजू शेट्टी यांनी जाहीर पाठिंबा आभार मानले व आपल्या विश्वासास पात्र राहून पुढील काळात काम करु असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी बोलताना मा.खा.राजू शेट्टी म्हणाले, सांगोला विधानसभा हा स्व.भाई.गणपतराव देशमुख यांचा हक्काचा मतदार संघ आहे.महाराष्ट्रामध्ये विक्रमी वेळा ते सांगोला मतदारसंघातून निवडून आलेले होते त्यामुळे या मतदारसंघांमध्ये आमच्या परिवर्तन महाशक्तीने आपला उमेदवार देण्याचे टाळले आहे , दुर्दैवाने शिवसेना उबाठा गटाने येथून उमेदवारी देऊन उद्धव ठाकरे यांनी शेकापवर अन्याय केला आहे आम्ही मात्र चळवळीची जाण ठेवून चळवळीचे भिष्माचार्य, शेतकरी, कष्टकरी, गोरगरीबांचे आधारस्तंभ असणारे आबासाहेब यांनी जवळजवळ ५५ वर्षे या भागातील लोकांची गर्हाणी विधानसभेत मांडली होती याची जाणीव ठेवून त्यांचे नातू डॉ.अनिकेत देशमुख व या मतदार संघामध्ये निवडणूक लढवित असलेले डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत कारण आम्ही चळवळीची भाऊबंदकी पाळतो, सांभाळतो व जपतो. त्यामुळे सांगोला तालुक्यातील आणि पंढरपूर तालुक्यातील काही गावांचा समावेश असणार्या या मतदारसंघातील कष्टकर्यांनी, शेतकर्यांनी, गोरगरीबांनी सर्वसामान्यांनी चळवळीची जान ठेवून, चळवळीचे नाते जपण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या शिट्टी या चिन्हावर मतदान करून सांगोला तालुक्यातील धंदेवाईक राजकारण्यांनी जो उच्छांद मांडला, जो पैशाचा बाजार मांडला आहे त्याला मूठमाती द्या आणि अजूनही आबासाहेबांची चळवळ सांगोला तालुक्यात जिवंत आहे हे दाखवून द्या,असे आवाहन सर्व मतदारांना शेतकरी नेते राजू शेठ्ठी यांनी केले.

Post a Comment
0 Comments