Type Here to Get Search Results !

विकासाच्या मुद्द्यावर सांगोल्यात यंदा परिवर्तनाची मशाल पेटणार ; दिपकआबा साळुंखे पाटील

 




सांगोल्याचे ग्रामदैवत श्री अंबिकादेवीचा आशीर्वाद घेऊन महाविकास आघाडीने फोडला प्रचाराचा नारळ



सांगोला (प्रतिनिधी)
 गेली ३० ते ३४ वर्षे मी सांगोला विधानसभा मतदारसंघात २४ तास काम करत आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील वाडीवस्तीवर माझा जनसंपर्क आहे. लोकांच्या अडचणी, व्यथा आणि वेदना यांची मला परिपूर्ण जाणीव आहे. आणि सांगोला विधान सभा मतदार संघाचे आगामी ५० वर्षांचे विकासाचे व्हिजन माझ्या डोळ्यासमोर आहे यंदा विकासाच्या मुद्द्यावर सांगोला विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची मशाल पेटणार असल्याचा विश्वास महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.

मंगळवार दि ५ नोव्हेंबर रोजी सांगोला शहरातील ग्रामदैवत अंबिका देवीचे दर्शन घेऊन महाविकास आघाडीने प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी जयमालाताई गायकवाड, साईनाथभाऊ अभंगराव, माजी आमदार डॉ.राम साळे, संभाजीराजे शिंदे, प्रा.पी.सी.झपके, डॉ.धनंजय पवार, कमरूद्दिन खतीब, अरविंद पाटील, यांचेसह आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना महाविकास आघाडीचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, कालपर्यंत अनेक मंडळी देव पाण्यात घालून बसली होती. जनतेच्या पाठिंब्यावर निवडणुकीत उभा राहिलो आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उध्दवसाहेब ठाकरेंनी माझी उमेदवारी जाहीर करून विजयाची मशाल हातात दिली. उध्दवसाहेब ठाकरेंनी सांगितल्यामुळेच गेल्या निवडणुकीत मित्राला आमदार केले. उध्दवसाहेब ठाकरे यांनी माझी आठवण ठेवली पण मित्राने आठवण ठेवली नाही. आबा मदत करायला लागला की बरा वाटतो अन् मी बाजूला झालो की वाईट ठरतो. शिवसेनेत पक्ष प्रवेश करण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी वाढतच चालली आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता आणि त्यांचा आपल्यावर असलेला विश्वास हेच आपले राजकीय भांडवल मानून मी ३० ते ३५  वर्षापासून जनतेची सेवा करीत आहे. विकासाचा आराखडा डोळ्यासमोर ठेवून काम करीत आहे. आमदार झाल्यावर पहिल्या आठवड्यातच रोजगार निर्मितीसाठी पाच एमआयडीसी आणून तालुक्यात उद्योग उभा करण्याचे स्वप्न आहे असेही यावेळी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी आवर्जून नमूद केले.यावेळी माजी आमदार डॉ राम साळे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, तानाजीकाका पाटील, तालुकाप्रमुख अरविंद पाटील, शहरप्रमुख तुषार इंगळे, काँग्रसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे, अजित देवकते, नितीन खाडे यांनी मनोगत व्यक्त करताना विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.

* ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है...!
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील त्यांच्या पाठीशी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते खंबीरपणे उभा आहेत. दिपकआबा हे सांगोला तालुक्याचे अत्यंत सुशिक्षित आणि सुसंस्कृत नेतृत्व आहे. रात्री अपरात्री त्यांना कधीही फोन केला तर ते सौजन्याने बोलतात कधीही सर्वसामान्य मतदारांना शिवीगाळ करत नाहीत अशा शेलक्या शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी शहाजीबापू पाटील यांचा समाचार घेतला. आणि येतो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है असा इशाराही त्यांनी शहाजीबापू पाटील आणि डॉ. बाबासाहेब देशमुख यांना दिला. 

Post a Comment

0 Comments