*तब्बल १५ महिन्यानंतर सखोल चौकशी करून आरोपीस अटक*आरोपीस ३ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी*
सांगोला (तालुका प्रतिनिधी) अनकढाळ ता.सांगोला येथे
अज्ञात व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्याच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात खून केलेल्या आरोपीस पोलिसांनी तब्बल १५ महिन्यानंतर सखोल तपास करून मुख्य आरोपीस अटक केली आहे.
ही घटना गुरुवार दि.१३ एप्रिल २०२३ रोजी उघडकीस आली होती या खुनाच्या घटनेचा तपास सोलापूर गुन्हे अन्वेषण विभाग व सांगोला पोलिसांनी करून विशाल दत्तात्रय बनसोडे वय २६ रा सावित्रीबाई फुले हौसींग सोसायटी, संभाजीपुर, नांदणी रोड, जयसिंगपुर ता.शिरोळ जि.कोल्हापुर यांस अटक केली असून त्यास काल शनिवार दि.२७ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीस ३ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे यां खुनाचा तपास करून पोलिसांनी तब्बल १५ महिन्या नंतर आरोपीस अटक केली आहे.
सांगोला पोलीस ठाणे हद्दीमध्ये अनकढाळ गावाचे शिवारात नाझरा मठ ते राजुरी गावाकडे जाणारे रस्त्यापासुन कुटे मळयाकडे जाणारे रस्त्यावर लिंगे यांचे शेतामध्ये अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाचा इसम जळालेल्या अवस्थेत मिळुन आला होता सदर अनोळखी ईसमास कोणीतरी अज्ञात ईसमाने, अज्ञात कारणावरून जीवे ठार मारुन अंगावर पेट्रोल ओतुन पेटवुन देवुन पुरावा नाहीसा करण्याचा प्रयत्न केलेला होता याबाबत पोलीस पाटील बाळासो बाबासो पाटील यांच्या फिर्यादीवरून १४ एप्रिल २३ रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्याचा तपास सांगोला पोलिसांनी सुरुवात केली होती परंतु त्यात यश येत नव्हते दरम्यान सोलापूर येथील फौजदार चावडी शहर येथे यातील मयताच्या वर्णनाचा इसम मिसींग झाल्याबाबत नातेवाईकांनी ११ एप्रिल २३ रोजी रमन सातप्पा साबळे , वय ३६ रा, लक्ष्मी पेठ, देगाव रोड, सोलापुर हे गायब असल्याची फिर्याद दाखल केली होती पोलिसांनी तपास करीत असताना मिसींग व्यक्तीबाबत समांतर तपास करीत असताना रमण साबळे याचा खुन व्यवसायीक भागीदार विशाल दत्तात्रय बनसोडे याने केल्याची गोपनीय माहिती मिळालेने त्यास पोलिसांनी कोल्हापूर येथुन ताब्यात घेवुन मिसींग व्यक्तीबाबत त्याचेकडे सखोल चौकशी केली पोलिसांच्या चौकशी

Post a Comment
0 Comments