सांगोला (प्रतिनिधी)
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे एकोणीसावे अधिवेशन पंढरपुर येथे संपन्न होणार असुन.सदर अधिवेशनास खा.शरदचंद्र पवार हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थीत राहणार आसुन.अधिवेशनाचे उध्दघाटन थोर विचारवंत व मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आॕफ इंडिया पक्षाचे सरचिटणीस काॅम्रेड दीपाशंकर भट्टाचार्य यांच्या शुभहस्ते होणार असुन..शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटनीस व पुरोगामी विचारांचे खंदे समर्थक भाई जयंत पाटील साहेब या़चे मार्गदर्शन महत्वाचे ठरणार आहे.तसेच अधिवेशनाच्या अध्यक्ष स्थानी कोल्हापुर जिल्ह्याचे थोर विचारवंत भाई संपतराव पवार -पाटील असणार आहेत.तसेच या अधिवेशनास मा.कराळे मास्तर यांच्यासहित अनेक विचारवंत सदर अधिवेशनामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.या अधिवेशनात शुक्रवार दि. २ आगस्ट २०२४ रोजी खुले सत्र होणार असुन दुपारी २ वाजता प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते क्रांती ज्योती मशालीचे प्रज्वलन करण्यात येणार आहे अधिवेशनाचे अध्यक्ष भाई संपतबापु पवार-पाटील यांच्या शुभहस्ते लाल ध्वजाला सलामी देण्यात येईल तसेच प्रमुख पाहुणे,उध्दघाटक व समविचारी नेते व विचारवंत यांचे स्वागत महात्मा फुले पगडी ,घोंगडे व आसुड देऊन करण्यात येईल. यावेळी स्वागताध्यक्ष डाॅ.बाबासाहेब देशमुख, सरचिटणिस भाई जयंत पाटील,मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आॕफ लिबरेशन पक्षाचे सरचिटणिस व थोर विचारवंत काॅ.दीपाशंकर भट्टाचार्य उध्दघाटनाचे भाषण करतील
तसेच दुपारच्या सत्रात खा.शरदचंद्र पवार साहेब हे उपस्थीत राहुन मार्गदर्शन करणार आहेत.सायंकाळी काॅ.उदय नारकर,अॕड सुभाष लांडे,काॕ.भिमराव बनसोड,काॅ.किशोर ढमाले,साथी प्रताप होगाडे हे शुभसंदेश पर भाषणे करतील यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे प्रा.एस .व्हि.जाधव हे राजकिय ठराव मा़डणार आहेत.
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार दि. ३ आॕगस्ट २०२४ रोजी सकाळी ९-०० वाजता महाराष्ट्रातील थोर विचारवंत कराळे गुरुजी यांचे संविधान या विषयावरती व्याख्यान होणार आहे.तसेच सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत राजकीय ठरावा वरती चर्चा होईल.दुपारी १२ वाजता अध्यक्षीय म़ंडळाच्या सहमतिने हा ठराव मांडण्यात येऊन मांडलेल्या ठरावरती सहमती घेण्यात येईल.तसेच दुपारी पक्षाचे पदाधिकारी ,सर चिटणिस व चिटणिस मंडळ,मध्यवर्ती समिती अशा विविध पदाधिकाऱ्यांच्या महत्व पुर्ण निवडी करण्यात येणार आहेत त्यानंतर पक्षाचे नवनिर्वाचीत सरचिटणिस अधिवेशनाच्या समारोपाचे भाषण करतील व अधिवेशनाची सांगता होईल.
शेतकरी कामगार पक्षाच्या १९ व्या अधिवेशनास शेतकरी कामगार पक्षाचे व पुरोगामी युवक संघटनेचे राज्यभरातुन जे नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते येणार आहेत त्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.तरी या महत्त्वपुर्ण अधिवेशनास सर्वांनी उपस्थीत राहावे असे अवाहन अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी केले असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली..

Post a Comment
0 Comments