Type Here to Get Search Results !

सांगोला येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती साठी टपाली ७४ टक्के मतदान ...

५८५ पैकी ४३७ मतदारांनी हक्क बजावला...


 सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ७  व पंचायत समितीच्या १४ जागेवर सार्वत्रिक निवडणूक होत असून काल रविवार रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे टपाली मतदान घेण्यात आले यावेळी एकूण टपाली मतदार ५८५  पैकी ४३७ मतदारांनी (७४ टक्के) आपला हक्क बजावला आहे.


     सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कर्तव्यावर असणारे अधिकारी यांना रविवार दि.१ फेब्रुवारी रोजी  सकाळी १० वा.पासून रात्री ८ ,पर्यंत मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी रांगा लावून उस्फूर्तपणे मतदान केले मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. टपाली मतदान करण्यासाठी निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी बी.आर. माळी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी केले होते,यावेळी एकूण ४३७  (७४%) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला  असंल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळूताई भागवत यांनी दिली
        टपाली मतदान केंद्राचे नोडल अधिकारी दिपाली जाधव , सहाय्यक  गटविकास अधिकारी वसंत फुले, गटशिक्षणाधिकारी सुयोग नवले व प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान अधिकारी, मतदान अधिकारी २ व ३ उपस्थित असल्याचे माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत यांनी दिली.

Post a Comment

0 Comments