Type Here to Get Search Results !

मुलीने लग्नास नकार दिल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या..

 सांगोला तालुक्यातील कटफळ येथील फॉरेस्ट मध्ये  गळफास घेऊन आत्महत्या..



सांगोला (प्रतिनिधी) मुलीने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून जेसीबी ऑपरेटरने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना मंगळवार दि.१७ डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कटफळ ता.सांगोला येथील फॉरेस्ट मध्ये घडली आहे.संजय भगवान केदार वय २५   रा.
लातुर जि. लातुर असे आत्महत्या केलेल्या जेसीबी ऑपरेटर तरुणाचे नाव आहे.
       गणेश संजय फाटे वय ३१ व्यवसाय गार्डी ता.पंढरपूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्याकडे एक जेसीबी मशीन असुन त्यावरती ऑपरेटर म्हणून संजय भगवान केदार रा लातुर हा मागील सहा महीण्यापासुन कामास आहे.जेसीबी मालक गणेश फाटे यांनी संजय केदार यास त्याचे दैनंदिन कामासाठी मोटारसायकल नं. एमएच १३ व्ही ८४१८ ही त्याचे जेसीबीचे दिलेली होती, दरम्यान मंगळवार दि. १७ रोजी सकाळी ११.२७ वाजता संजय केदार याने त्याचे मोबाईलरुन जेसीबी बालक गणेश फाटे यांच्या मोबाईलवर फोन करुन माझे एका मुलीवर प्रेम आहे. ती मला लग्नाला नकार देत आहे. आता माझी जगण्याची इच्छा संपली आहे. असे म्हणुन फोन ठेवून दिला, त्यानंतर संजय केदार याने गणेश फाटे यास व्हाट्सअप वर करंट लोकेशन पाठविले, त्यानंतर गणेश फाटे व त्याचा मित्र ज्ञानेश्वर वाघमारे असे संजय केदार यांस शोधत त्याने पाठविलेले लोकेशनवरती दुपारी १२.०५ वाजण्याच्या सुमारास गेले असता कटफळ ता.सांगोला गावचे शिवारात फॉरेस्टचे आवारात  वरिल मोटारसायकल एका ठिकाणी लावलेली दिसली  मोटारसायकलचे आजुबाजूस संजय केदार यांचा शोघ घेतला असता फॉरेस्ट मधील पाझर तलावात असलेल्या  पळसाचे झाडास संजय केदार याने दोरीने गळफास घेतलेल्या अकस्थेत दिसुन आला त्या ठिकाणी  कटफळ गावातील काही लोक जमलेले होते, त्यापैकी कोणीतरी पोलीस स्टेशनला कळविल्याने काही वेळानंतर पोलीस घटनास्थळावर येवुन त्यांनी पाहणी केल्यानंतर संजय केदार यास खाली उतरुन सांगोला ग्रामीण रुग्णालयात   आणले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी संजय केदार यास तपासुन तो उपचारपुर्वी मयत झाल्याचे  सांगितले याबाबत गणेश फाटे याने पोलिसात खबर दिली आहे.

Post a Comment

0 Comments