Type Here to Get Search Results !

अकोला ता.सांगोला येथे बुधवारी खा. धैर्यशील मोहिते यांची जाहीर सभा..

 *डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांची आज अकोला येथे जाहीर सभा*


*सांगोला (तालुका प्रतिनिधी) महाविकास आघाडी, इंडिया अलायन्स, शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची आज बुधवार, १३ नोव्हेंबर रोजी अकोला येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे  सायं.७  वा.जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.

      महाविकास आघाडी, इंडिया अलायन्स, शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांना माजी खा. राजू शेट्टी, माजी खा. छत्रपती संभाजी महाराज, आ. बच्चू कडू यांची परिवर्तन महाशक्ती, डॉ.प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, राष्ट्रीय समाज पक्ष आदी राजकीय पक्षांसह बुद्ध भीमराय सामाजिक संघटना, आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक सामाजिक संघटना यांच्यासह विविध संस्था, सामाजिक संघटना यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. याशिवाय सांगोला विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या तब्बल ११  उमेदवारांनी अर्ज मागे घेऊन डॉ. बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा दिला आहे. या जाहीर सभेसाठी शेतकरी कामगार पक्ष तसेच मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments