,... ५० खोक्याचे आता सुट्टे पैसे झाले आहेत..- सांगोला येथील सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आ. शहाजीबापू पाटील यांच्या घनाघाती टीका..
सांगोला (तालुका प्रतिनिधी) तुमच्या येथील गद्दार आमदाराला आम्ही काहीही कमी केले नव्हते, तो विकला गेला आहे,अमित शहा यांनी फडणवीस याला मुख्यमंत्री जाहीर केले आहे, आता तुमची गरज संपली, मिंधेना भांडी घासत बस म्हणावं, ५० खोक्याचे सुट्टे पैसे झाले आहेत येणाऱ्या निवडणुकीत त्याचा माज, मस्ती उत्तरेविल्या शिवाय राहणार नाही असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले ते काल रविवार दि.८ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता सांगोला येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर शिवसेनेचे उमेदवार दीपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारासाठी सांगोला येथे आले होते त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उमेदवार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी सांगोला तालुक्यातील अडीअडचणी व इतर मागण्यांचे निवेदन उद्धव ठाकरे यांना दिले. या जाहीर सभेस विराट संख्येने महिला ,कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी मतदार संघातील अडचणी व मागण्यां या सोडविण्याबाबत ठाकरे यांना विनंती केली.उद्धव ठाकरे पुढे म्हणाले तुम्ही ज्या अडीअडचणी निवेदन देणार आहात त्या मी आता हातात घेणार नाही, तूम्ही आमदार होवून आला तर आणि तरच निवेदनातील सर्व गोष्टी मंजूर करणारं, दीपक आबाना निवडूण द्यायचे की नाही हे आता तुमच्या हाती आहे पण तुम्हाला पाठवावचं लागेल, त्या गद्दार आमदाराला २३ तारखेनंतर गोहटीला पाठवायचे आहे , तिकडे जावून झाडी डोंगर मोजत बसं म्हणावं, प्रत्येकाचं नशीब असते संधी मिळत असते त्याचे सोनं करायचे की माती करायची हे ज्याने त्याने ठरवायचे गेल्या वेळेला एका गद्दारला मी सांगितले म्हणून तूम्ही निवडूण दिले त्यांने त्या संधीचे मातेरे केले,त्याला माज ,मस्ती आली होती तो यां निवडणूकीत उतरायचा आहे त्यासाठी मी आलो आहे मी गद्दाराला गाडायला आलो आहे, मी आज आलोय गद्दाराच्या छाताडावर पुन्हा एकदा भगवा झेंडा फडकवण्यासाठी, महाराष्ट्रातील जनता गद्दाराना कधीही पाठीशी घालत नाही, खरं म्हणजे मागील निवडणुकीत दीपक आबांना तिकीट देणार होतो परंतु (तानाजी सावंत यांचे नाव न घेता) धरण फोडणारा खेकडा आला होता त्याने चुकीचे मार्गदर्शन केले नाहीतर दीपकआबा आज आमदार असते जो गद्दारीचा वार केला त्याला नेस्तनाबून करण्यासाठी जनता वाट बघत आहे , त्याने शिवसेनेवर वार केला नाही तर महाराष्ट्राच्या कुशीवर वार केला आहे सध्या मोदी आणि शहा महाराष्ट्रात फिरत आहेत अमित शहा तर मुन्नाभाई मधील सर्किट सारखे फिरत आहेत , तुम्ही ३७० कलम काढले पण आज शेतमालाला भाव मिळत नाही, हे कलम काँग्रेस काढायला लागली म्हणून तुम्ही माझ्यावर टीका करीत आहात परंतु शहा तुम्हाला स्मृतिभंश झाला असेल तर सांगतो मीच लोकसभेत ३७० कलम साठी पाठिंबा दिला होता हे लक्षात ठेवा, आणि निर्वासीत काश्मीरी बांधवाना हे कलम काढल्यानंतर किती जणाला काश्मीरला तुम्ही घेऊन गेलात हे सांगा, आज जनता रोजगार, शेतीला हमीभाव मागते तुम्ही सांगता ३७० कलम काढले राम मंदिर बांधले हे चालणार नाही , सध्या जनतेला फसवायचे काम सुरू आहे ,हिंदू मुस्लिम वाद निर्माण केला जात आहे, तुम्ही मूलभूत प्रश्नावर बोला जाती धर्मात तेढ निर्माण करू नका , आज मुंबई अदानी , अंबानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे उद्या तुमच्या सात बारावरही त्यांचे नाव येऊ शकेल त्यामुळे सावध राहा , आपणाला स्वाभिमान आहे की नाही मोदी ,शहा यांनी यायचे आणि टपली मारून जायचे व आपण शाहू फुले आंबेडकर म्हणायचे हे चालणार नाही , पश्चिम महाराष्ट्र हा सहकाराचा पट्टा आहे , सहकार हा राज्याचा विषय परंतु शहा यांनी सहकार मंत्रालय स्थापन केले व ते खाते त्यांच्याकडे घेतले सहकार नेत्यावर धाड वगैरे टाकत आहेत भाजपची नीती वापरा आणि फेकून द्या अशी आहे, भाजपने दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून जाहीर केले आहे आता त्या मिंधेला म्हणाव भांडी घासत बस, आणि या डोंगर झाडी वाड्याला माती पूरवत बसं म्हणावं अशी टीका केली, आता तुमचा उपयोग संपलेला आहे, भाजपाचा नारा बटेंगे तो कटेंगे असा नसून महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तोको बाटेंगे असं आहे तुम्ही उद्धव ठाकरे यांना संपवण्यापेक्षा मनिपुर मधील हिंसाचार थांबवा, हे खोके वाले मन की बात करतात ,मी मात्र जन की बात करीत आहे, मी मुख्यमंत्री असताना एकही उद्योग गुजरातला गेला नाही परंतु आता उद्योग गुजरातला पळविले जात आहेत, आपला महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर यांचा राहणार की मोदी ,शहा ,अदानीचा राहणार याचा विचार करावा लागेल, ही ठरविणारी ही निवडणूक आहे तुमच्याकडे डाळिंब प्रक्रिया ,दूध प्रक्रिया उद्योग नाहीत ते आत्तापर्यंत का झाले नाहीत, आज महिलांना पंधराशे रुपये दिले जातात परंतु एकीकडे महागाई वाढवायची व दुसरीकडे पाने पुसायची आमचे सरकार आल्यानंतर तीन हजार महिलांना देऊ व पाच वर्ष वस्तूंचे भाव स्थिर ठेवू, जाती धर्मात भांडणे लावून आपली पोळी भाजण्याचे प्रयत्न सुरू आहेत , मी शिवसेनाप्रमुखांचे विचार सोडले नाहीत, महाराष्ट्रात भाजपला कोणीही ओळखत नसताना आम्ही आधार दिला तेच आम्हाला हिंदुत्व शिकवत आहेत, त्यावेळेला आपण भाजपला खांद्यावर घेऊन मिरवले नसते तर ते आज दिसले नसते, पण त्यांच्या लक्षात नाही खांदा दोन प्रकारचा असतो, आम्ही खांद्यावर घेतो व खांदा देतो. असे सांगून पन्नास खोके आता सुट्टे पैसे झाले आहेत, गद्दार विकला गेलाय तुम्ही विकता कामा नये, मागील आठवड्यात तुमच्या येथील एक गाडी पकडली होती त्याच्यामध्ये २५ खोके होते पण प्रत्यक्ष पाच खोके दाखविले बाकीचे वीस खोके इकडे आले आहेत तुम्ही हा हरामचा पैसा घेऊन तुमचे विचार विकणार आहात का असा सवाल करुन येणाऱ्या निवडणुकीत दीपकआबा साळुंखे पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

Post a Comment
0 Comments