Type Here to Get Search Results !

सांगोला मतदारसंघात सर्व इच्छुकांची निवडणुकीसाठी तयारी जोमात..,.. शेकाप कडून दोन डॉक्टर बंधू पैकी कोण.... मा.आ. दीपक आबा अधिकृत पक्षाकडून ही अपक्ष... अफवांचे पीक जोमात...

 "बहुचर्चित; आमदार शहाजीबापूंचा विकासरथ कोण रोखणार..


सांगोला (प्रतिनिधी) सांगोला विधानसभा निवडणुकीत २०१९ च्या निवडणूकीत एकत्रीत सामोरे गेलेले आ. शहाजीबापू पाटील व मा.आ. दिपकआबा साळुंखे पाटील या दोघांतील मैत्रीस उमेदवारीवरून घमासान सुरू असून ते  दोघे एकमेकांविरुद्ध निवडणुकीसाठी उभे ठाकले असून विरोधी महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या शेकापमधे ही उमेदवारीवरून दोन डॉक्टरांमध्ये संघर्ष तीव्र झाला असून विधानसभेचे रण मैदान जाहीर होण्याअगोदरच तालुक्यात राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे त्यामुळे विद्यमान आमदारां विरुद्ध हे तीन इच्छुक मातंबर उमेदवार कशी लढत देणार याचे चित्र सध्या तरी अस्पष्ट आहे.
       दिवंगत आमदार गणपतराव देशमुख यांचा सांगोला विधानसभा मतदारसंघ हा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो त्यांनी सांगोला मतदार संघातून १३ वेळा निवडणूक लढवली व अकरा वेळा त्यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केले मागील विधानसभा निवडणुकीत वयोमानामुळे त्यांनी निवडणूक न लढविता पक्षातील नेत्यांच्या आग्रहास्तव त्यांचे नातू डॉ.अनिकेत देशमुख यांना उमेदवारी दिली त्यांचा निवडणुकीत निसटता पराभव झाला व ऍड.शहाजी बापू पाटील हे आमदार झाले या निवडणुकीत माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता परंतु त्यांनी ऐनवेळी माघार घेऊन शहाजी बापू पाटील यांना पाठिंबा दिला व  ऍड.शहाजी बापू पाटील हे दुसऱ्यांदा आमदार झाले  गेली पाच वर्षे आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील हे तालुक्याचे राजकारण एकोप्याने करीत होते आमदार पाटील यांनी दुसऱ्याला आमदार झाल्यापासून तालुक्यात कोट्यावधी रुपये किमतीची विकास कामे केली आहेत त्यांनी तालुक्यासाठी उजनी धरणाचे दोन टीएमसी पाणी पुनश्च मंजूर करून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून निविदा काढली आहे त्यामुळे  सर्व पाणी योजनातून तालुक्यास शेतीचे पाणी मिळणार असल्याचा ते दावा करतात.मागील काही दिवसात तर तालुक्यातील सर्व समाज घटकासाठी मागेल त्याला मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे या विकास कामाच्या जोरावर ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सामोरे जाणार आहेत. तर त्यांचे सहकारी माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. मी अनेकवेळा शेकापक्षाला व विद्यमान आमदार पाटील यांना  दोन वेळा सहकार्य केल्यामुळे ते आमदार झाले आहेत त्यामुळे यंदा येणाऱ्या निवडणुकीत मला सर्वच पक्षातील नेतेमंडळी व कार्यकर्ते प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणार असल्याचे  निवडणुकी पासून आता माघार नाही असे म्हणून प्रत्यक्ष निवडणुकीतील सूक्ष्म नियोजन करीत आहेत.त्यासाठी त्यांनी तालुक्यातील बाहेरगावी असलेल्या मतदाराशी संपर्क साधला आहे व गाव भेट दौरे करून जोमाने कामास लागले आहेत जरी  त्यांनी अनेक निवडणुकीत काळानुरूप बदल केला असला तरी आत्तापर्यंत आपल्या मतांचा एक गट्टा मतदार स्वतःभोवती केंद्रित ठेवला आहे मागील २५ वर्षात त्यांनी राजकीय सोयीनुसार  कधी शेकापला  तर कधी शहाजीबापू पाटील यांच्या मागे ही एक गठ्ठा मते वळती केली आहेत त्यामुळे शेकाप व शहाजी बापू हे दोघेही आमच्या मतावर निवडून आले असल्याचे आवर्जून सांगतात त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत दीपक आबांची पारंपरिक मते व सर्व पक्षातील अदृश्य शक्ती कडून त्यांना पाठिंबा मिळणार असल्याने ते यंदाच्या  निवडणुकीसाठी सज्य झाले असल्याचे दिसून येते तर शेकापला उमेदवारीवरून डॉ.बाबासाहेब व डॉ.अनिकेत देशमुख यांच्यात अंतर्गत संघर्ष तीव्र आहे उमेदवारीवरून सुरू असलेला हा संघर्ष मिटल्यास शेकापला या निवडणुकीत यश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असले तरी येत्या दोन-तीन दिवसात प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येणार असून शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील, शेकाप कडून देशमुख बंधू तर माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील हे तुतारी ,मशाल की अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार याचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे त्यामुळे सांगोला मतदार संघाची होणारी निवडणूक प्रतिष्ठेची व रंगतदार होणार आहे.
   " सांगोला मतदार संघाची जागा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाची असून यावर महाविकास आघाडीतील नेत्यांचे  एकमत झाले आहे त्यामुळे या मतदार संघाची जागा शेतकरी कामगार पक्ष मोठ्या ताकतीने लढविणार आहे. सध्या सांगोला मतदार संघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस  शरद पवार गटास मिळणार असून तूतारी या चिन्हावर शेकाप मधील उमेदवार निवडून लढवणार असल्याची केवळ चर्चा आहे परंतु तसे काहीही होणार नसुन सांगोला मतदार संघात महाविकास आघाडीचा तेही शेकापचाच उमेदवार निवडणुक लढविणार असल्याचे खात्रीशीर सूत्राकडून सांगण्यात आले.;

Post a Comment

0 Comments