* महायुतीचे उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांचे चिकमहुद येथे जंगी स्वागत व सत्कार संपन्न
सांगोला (तालुका प्रतिनिधी) १९९० पासून तालुक्याच्या राजकारणात अनेक चढउतार पाहिले. ७ वेळा विधानसभा निवडणूक लढविली. तालुक्याला लागलेला दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी मी माझे आयुष्य पणाला लावले. १९९५ व २०१९ ला आमदार झाल्यानंतर तालुक्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने गती आली. टेंभू ,म्हैसाळ, उजणीचे पाणी तालुक्याला आणले त्यातून निश्चितपणे शेतीचा व शेतकऱ्याचा विकास होणार आहे. तालुक्यात हरितक्रांती घडविण्याचे माझे स्वप्न पूर्ण होत आहे यात खरा आनंद आहे. मी टीकाटिप्पणी ला घाबरत नाही पाच तारखे नंतर सगळ्यांचा हिशोब केला जाईल असे आम. शहाजीबापू पाटील यांनी चिकमहुद येथे झालेल्या स्वागत समारंभात व्यक्त केले.
सांगोला विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील हे शुक्रवार दि. २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता मुंबईवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते एबी फॉर्म घेऊन महुद येथे आले . यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या स्वागत व सत्कारासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमप्रसंगी आमदार शहाजीबापू पाटील बोलत होते.
शहाजीबापू पाटील पुढे म्हणाले, सांगोला तालुका मजूर पुरवठा करणारा तालुका म्हणून तालुक्याची ओळख होती हे चित्र बदलले आहे .तालुक्यात लवकरच मोठ्या प्रमाणात शेती सिंचनाखाली येत असून तालुक्यातील एकही गाव शेतीच्या व पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही .पुढील वर्षाच्या दिवाळीपूर्वी प्रत्येकाच्या शेतात पाणी पाहायला मिळेल तसेच विरोधक माझ्यावर मोकळी टीका करतात आधी त्यांनी काय केले हे तपासावे.
शहाजी बापू पुढे म्हणाले हिंदकेसरी पैलवानाला चितपट केलेला मी आहे असे सांगून गणपतराव देशमुख यांनी सांगोल्यात ,पंढरपूरला, मुंबई व त्यांच्या मूळ गावी बंगले बांधले मी ४० वर्षे पत्र्याच्या घरात राहत होतो आता मी बंगला बांधला तर तुमच्या पोटात का दुखते आहे असा विरोधकांना सवाल त्यांनी केला. मी रात्री दोन वाजेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेसोबत चर्चा केली त्यांना दीपकआबा साळुंखे पाटील यांच्यासाठी काहीतरी करा, त्यांना मोठे पद द्या असे सांगितले आहे आणि त्यांचा नंबरही दिला आहे त्यामुळे दीपकआबांची मी अजूनही वाट पाहणार आहे,दीपक आबा माझे चांगले मित्र आहेत त्यांनी कोलकत्ता, मुंबई ,बेंगलोर असे दौरे केले असले तरी १९९५ साली झालेल्या निवडणुकीत गणपतराव व आबा तुम्ही एकत्रच होता त्यावेळेला मी तुमचा पराभव केला आता सारखे तुम्ही म्हणत आहात २०१९ ला माझ्यामुळे विजय झाला असे तुम्ही म्हणण्याचे कारण नाही, आता हे सर्व बस करा ,तुमचा हातभार लागला हे मी मान्य करीन , तुमच्यासारख्या अनेक लोकांचा माझ्या विजयात सहभाग असल्याचे सांगितले. आता निवडणूक असल्याने तुम्ही महागडे टी-शर्ट , वेगवेगळे पेहराव घालून शेतकऱ्याच्या बांधावर जात आहात परंतु तुम्हाला शेतीतले काय समजते हे सांगा, मी आता शेतात मोटार चालू करतो तुम्ही दारे धरू शकणार आहात का ?
लोक एरंडाच्या झाडाला दगड मारत नाहीत माझे आंब्याचे झाड आहे त्यामुळे मला विरोधक दगड मारतील याकडे लक्ष देऊ नका अजून खरी निवडणूक सुरू व्हायची आहे पाच तारखेनंतर सगळ्यांचा हिशोब चुकता करू असे सांगून येणाऱ्या निवडणुकीत विजय करण्याचे आवाहन केले.यावेळी शिवसेनेचे विजयदादा शिंदे, दादासाहेब लवटे, नितीन गायकवाड ,एन वाय.भोसले सर, दीपक दिघे, दत्ता नागणे ,पांडुरंग हाके ,राजनंदनी पाटील, श्रीकांत पाटील, पंकज काटे यांचे सह चिकमहुद परिसरातील नागरिक, महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments