Type Here to Get Search Results !

जनतेच्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही: डॉ.बाबासाहेब देशमुख.

 

शेकापच्या पाठीशी खंबीर उभे राहणार; पुणेकरांचा स्नेह मेळाव्यात निर्धार

सांगोला(प्रतिनिधी):-येणार्‍या काळामध्ये शिक्षण, आरोग्य आणि निवारा या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मागील पाच वर्षांमध्ये तालुक्यातील काही गावांमधील आरोग्य केंद्रांची दयनीय अवस्था झाली आहे ती सुधारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे सांगोला तालुक्यातील तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून पुढाकार घेतला जाईल. सांगोला तालुक्याने गोरगरीब जनतेसह सर्वसामान्यांनी ६० वर्षे आबासाहेबांवर जो विश्वास टाकला होता. त्या विश्वासास पात्र राहून जनतेची सेवा करणार असून जनतेच्या विश्वासास कदापीही तडा जाऊ दिला जाणार नसल्याचे डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.

सांगोला तालुका रहिवासी संघ पुणे पिंपरी चिंचवड सेवा मंडळाच्या वतीने पुणे विभागात वास्तव्यास असलेल्या सांगोलकरांनी एकत्र येऊन डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याशी संवाद साधण्यासाठी शनिवार दि. १९ ऑक्टोबर २४ रोजी स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी हजारो नागरीक व महिला सांगोलकर या स्नेह मेळाव्यास उपस्थित होते याप्रसंगी डॉ.बाबासाहेब देशमुख बोलत होते.
या मेळाव्यासाठी पुणेकरांनी कुटुंबीयांसह प्रचंड गर्दी करून डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्याशी संवाद साधला व येणार्‍या काळात डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून साथ देण्याची ग्वाही दिली. त्याचप्रमाणे येणार्‍या निवडणुकीत शेकापचाच आमदार करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मी तुमच्याशी संवाद साधणार नाही तर येणार्‍या कालावधीत २४ तास आपल्या सेवेस हजर राहू असे डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आश्वासित केले.
या स्नेह मेळाव्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून मारुती येडगे (माय भूमी उद्योग समूह पुणे)पांडुरंग गावडे (मातोश्री रोडलाईन्स पुणे) व  अशोक नरळे (सई आकांक्षा बिल्डकॉन) हे मान्यवर लाभले. या स्नेह मेळाव्यामध्ये" कर्मयोगी आबासाहेब ;या चित्रपटातील कलाकारांचे व दिग्दर्शक लेखक यांचा सन्मान करण्यात आला हा चित्रपट येत्या २५ ऑक्टोबर ला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष कारंडे ,धनंजय मासाळ,  धनाजी वलेकर, धनाजी नवले, उमेश बिचुकले, अरविंद वलेकर ,काशिनाथ आलदर, अजिंक्य फुले ,गोरख वाघमोडे ,अजय इमडे ,विनायक चौगुले, महेश बजबळकर ,समाधान पवार, शिवाजी हांडे, विनायक पाटील यांनी  परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रस्तावना गोरख खरात यांनी केली व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  अंकुश सातपुते यांनी केले, कार्यक्रमासाठी उपस्थित असणार्‍या सर्व मान्यवरांचे व पुणेकरांचे पुणेकर संयोजन समितीच्या वतीने उमेश बिचुकले यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments