Type Here to Get Search Results !

*सांगोला मतदारसंघात शेकापची मतपेढी शाबूत असली तरी आ.शहाजीबापू पाटील यंदा काठावर पास होण्याऐवजी मेरीट मध्ये येण्यासाठी प्रयत्नशील...:*


*शेकापकडून हृदयरोग तज्ञ की हाडाचे तज्ञ तर मा.आ.दिपकआबा म्हणतात...मी व बापू उमेदवारीचे बघून घेतो...!


सांगोला ,(अविनाश बनसोडे) सांगोला हा विधानसभेचा मतदार संघ गेली पाच दशके दिवंगत आ.गणपतराव देशमुख यांच्या शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ऍड. शहाजीबापू पाटील यांनी शेकापचा हा बालेकिल्ला उध्वस्त करीत तो  शिवसेनेकडे खेचून आणला.१९९५ व २०१९ यां दोन्ही निवडणुकीत आ.शहाजी पाटील हे अल्पमताने निवडूण येवून काठावर पास झाले होते यंदा ही परंपरा खंडित करून येणाऱ्या निवडणुकीत आ.शहाजीबापू पाटील विकास कामाच्या जोरावर  मेरिट मध्ये निवडून येणार का ? याची चर्चा तालुक्यात होताना दिसून येत आहे. दुसरीकडे विरोधी शेतकरी कामगार पक्षाकडून  निवडणुकीत हृदयरोग तज्ञ असणार की हाडाचे तज्ञ यापैकी कोण असणार त्यामुळे शेकाप कार्यकर्ते मात्र सध्या  द्विधा अवस्थेत असल्याचे दिसून येते.तर माजी आ.दीपकआबा साळुंखे पाटील यांनी निवडणुकीपूर्वी  मतदारसंघाचा गाव भेट दौरा करून  मी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलो तरी मी आणि बापू दोघेही एकच असून निवडणुकीचे आम्ही दोघे बघून घेतो  असे वक्तव्य करून स्वतःच्या व बापूंच्या कार्यकर्त्यांना बुचकळ्यात टाकल्याचे दिसून येत आहे पण लोकसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये राज्यातील हवा पुन्हा बदलल्याचे दिसून आले आहे,त्यामुळे येणारी निवडणुक अटीतटीची होणार असल्याचे जाणवते. असे असले तरीही शेवटी मतदारसंघातील जनता कोणाच्या पारड्यात भरभरून दान देते हे येणाऱ्या काळात पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
  आ. शहाजीबापू पाटील यांनी गेल्या साडेचार वर्षात सांगोला मतदार संघात हजारो कोटी रुपयांचा निधी खेचून आणल्याने तालुक्यातील अनेक कामे मार्गी लागली आहेत. त्यातील महत्त्वाचे काम म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून उजनीचे सांगोला तालुक्याचे हक्काचे दोन टीएमसी पाणी कागदोपत्री मंजूर होते या योजनेचे साळमुखच्या टेकडीवर दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाले परंतु निधी अभावी तसेच सांगोले सारख्या दुष्काळी भागास पाणी न मिळो अशी भावना असलेल्या तालुक्या बाहेरील राजकीय पुढार्‍यांच्या अनास्थेमुळे काम रखडवले गेले या योजनेचे नामकरण केलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन असे नामकरण करून कामाची निविदा निघाल्याने बापूंची ही मोठी उपलब्धी असल्याचे बोलले जात आहे तसेच पाण्यापासून वंचित असलेल्या पश्चिम भागातील १४  गावाचा समावेश केल्याने या दुष्काळी पट्ट्यासही याचा फायदा होणार आहे. जून महिन्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थिती असतानाही माण  नदीत टेंभूचे पाणी सोडून सर्व बंधारे भरून घेतले त्यामुळे तालुक्यातील दुष्काळाची दाहकता काही प्रमाणात कमी झाली होती त्यांनी आपल्या कार्यकाळात कोट्यावधी रुपयाची अनेक कामे त्यांनी मार्गी लावली आहेत त्यामुळे ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी नव्या उत्साहाने सज्ज झाले असून आता काठावर पास न होता सर्व रेकॉर्ड ब्रेक करून मेरिटमध्ये निवडून येणार असल्याच्या अविर्भावात वावरत असल्याचे दिसून येत आहे.
       शेकापचे डॉ.अनिकेत देशमुख यांचा २०१९ चा अल्पमताने झालेला पराभव शेकाप कार्यकर्त्याच्या जिव्हारी लागल्याने कार्यकर्ते निवडणुकीची वाट पाहत असले तरी  येणाऱ्या निवडणुकीत डॉ.अनिकेत देशमुख (एमएसअर्थो) की डॉ.बाबासाहेब देशमुख (एमडी.मेडीसिन,डीएनबी) या दोघांतील निवडणुक कोण लढविणार यां पेचामुळे कार्यकर्ते श्रद्धा आणि सबुरीने घेत असल्याचे दिसून देत आहे.मतदारसंघातील शेकापची मतपेढी शाबूत असली तरी पक्षातील काही नेते सध्याच्या पक्ष नेतृत्वापासून चार हात लांबच असल्याचे दिसून येते. शेकाप नेतृत्वाने गेल्या ५० वर्षात पक्षात पक्षातील स्वकियांचा प्रखर विरोध असतानाही अनेकांना मोठी पदे दिली, ज्यांनी भांडून पदे घेतली,उपभोगली ते आता कुठे आहेत.तळागाळातील कार्यकर्ता हीच शेकापची खरी ताकत आहे.आत्मप्रौढी, खुषमस्करे इत्यादीमुळे मान ,हात थरथरेपर्यंत पदाला चिकटून राहिलेले सध्या काय  करत आहेत. शेकाप कार्यकर्त्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची आहे पदे भोगलेले अनेक जण एकतर विरोधकांच्या वळचणीला आहेत किंव्हा दुरूनच काड्या करीत असल्याचे बोलले जात आहे शेकापच्या पडत्या काळात वेठीस धरणाऱ्यानी प्रथमतः आपले अस्तित्व तपासून पाहावे दगा, फितुरी करणाऱ्यांनी एकतर ईमानदारीने पक्षाचे काम करावे अन्यथा बाहेरचा रस्ता धरावा असे कार्यकर्त्या मधून बोलले जात आहे.गेल्या दोन, तीन वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे निर्ढावलेले अधिकारी,कर्मचारी  सर्वसामान्य लोकांची कामे करण्यास टाळाटाळ करतात,सबंधील कार्यालय अनेक हेलपाटे मारले तरीही कोणीही दाद देत नाही , सर्व शासकीय कार्यालयात सर्व काही आलबेल नसून, चिरी मिरी दिल्याशिवाय कामे मार्गी लागत नाहीत,लोकप्रतिनिधी तसेच त्यांच्या समर्थकांकडून तालुक्यातील सर्वच कार्यालयात राजकीय हस्तक्षेप वाढला आहे असे असताना सर्वसामान्य  लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवणे हे विरोधी पक्षाचे काम आहे परंतु त्यात शेकाप नेतृत्व कमी पडले असल्याची चर्चा आहे.अशा विपरीत परिस्थितीत प्रत्यक्ष ऐन निवडणुकीपूर्वी शेकापने विधानसभा निवडणुकीसाठी एकसंघपणे सामोरे जाण्याऐवजी उमेदवारीवरून वादंग होणे हे शेकापसाठी धोक्याची घंटा असल्याचे दिसून येते.निवडणूकी पूर्वी उमेदवारीवरून पक्षांतर्गत एकमत न झाल्यास पुढील सर्व समीकरणे बदलणार आहेत त्यामुळे पक्षातील नेत्यांनी अंतर्गत वाद मिटवण्यासाठी आतापासूनच प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.येणाऱ्या सांगोला विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढणार असली तरी खरी लढत शिवसेनेचे आ.शहाजीबापू पाटील व शेकाप उमेदवार यांच्यातच होणार असल्याचे दिसून येते.





Post a Comment

0 Comments