Type Here to Get Search Results !

*सांगोला आठवडा बाजारातील भूमिपूजन केलेले मटन मार्केट फेज २ चे बांधकाम चुकीच्या ठिकाणी होत असल्याची नागरिकात चर्चा..*

*ओढ्यालगत वाहन तळावरील मोकळ्या जागेवर बांधकाम करावे..* विद्यमान आमदार,मा.आमदार व लोकप्रतिनिधीनी लक्ष घालावे..*


सांगोला (तालुका प्रतिनिधी)  सांगोला शहरातील आठवडा बाजार येथे  भूमिपूजन झालेल्या जागेवर मटन मार्केट उभारण्यास बाजारातील व्यापारी व किरकोळ स्टॉल धारकांनी विरोध केला असून भूमिपूजन केलेल्या जागे ऐवजी ओढ्याकडील बाजूला मटन मार्केट उभा करावे अशी मागणी केली जात आहे.
       शनिवार दि.२० जुलै रोजी आमदार शहाजीबापू पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते शहरातील आठवडा बाजारातील १ कोटी ४५ लाख रु.खर्चाच्या मटन मार्केट फेज २ च्या बांधकामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला हे  भूमिपूजन केलेले प्रस्तावित मटन मार्केट आठवडा बाजारातील व्यापारी व किरकोळ विक्री करणाऱ्या भाजी विक्रेत्याना गैरसोयीचे ठरणार असल्याचे म्हणणे आहे.नगर परिषदेच्या मालकीची आठवडा बाजारा शेजारी ओढ्यालगत असलेली वाहन तळासाठी (पार्किंग) सध्या वापरात असलेली मोकळी जागा शिल्लक आहे त्या जागेवर नवीन मटन मार्केट फेज २  उभारणे सोयीचे होणार आहे. सध्याच्या मटन मार्केटला लागून भूमिपूजन केलेल्या जागेवर मटन मार्केट  बांधल्यास सांडपाणी व दुर्गंधीचा त्रास सर्वच आठवडा बाजारातील विक्रेत्यासह नागरिकांना होणार आहे.
        आठवडा बाजारात असलेल्या मटन मार्केट मधील सुमारे २० गाळ्या पैकी सध्या फक्त सहा मटन विक्रीची दुकाने सुरू आहेत जुन्या  मटन मार्केट मधील अनेक गाळे सध्या कुलूपबंद आहेत या मटन विक्रेत्यांनी सांगोला शहरातील वासुद रोड, मिरज रोड, चिंचोली रोड, एखतपुर रोड व इतर ठिकाणी स्थलांतरित केली आहेत  त्यामुळे नवीन मटन मार्केट ची शहरवासीयांना खरंच गरज आहे का ? असाही प्रश्न विचारला जात आहे. आमदार शहाजीबापू पाटील यांनी नवीन मटन मार्केट साठी १ कोटी ४५ लाख रुपये निधी उपलब्ध झाला हे सांगोला शहराच्या दृष्टीने चांगलेच आहे या कोट्यावधी रुपयाच्या निधीमुळे  सांगोला शहराच्या विकासात भरच पडणार आहे  परंतु नवीन मटन मार्केट भूमिपूजन केलेल्या जागे ऐवजी आठवडा बाजारा लगत असलेल्या ओढ्याजवळील वाहन तळाच्या मोकळ्या जागेवर बांधणे सर्वांच्या दृष्टीने सोयीचे होणार असल्याचे बोलले जात आहे.
*सध्या भूमिपूजन केलेल्या जागेवर मटन मार्केट फेज २ बांधणे व्यापारी, किरकोळ भाजी विक्रेते व नागरिकांसाठी गैरसोयीचे होणार आहे या जागे ऐवजी ओढ्या जवळील वाहन तळाच्या जागेवर मटन मार्केट बांधल्यास सांडपाणी व रक्त मिश्रित पाण्यासाठी स्वतंत्र गटाराची आवश्यकता भासणार नाही व बाजारकरूना त्रासही होणार नाही त्यामुळे भूमिपूजन केलेल्या ठिकाणी मटन मार्केट बांधकाम सुरू करू नये.... माजी नगरसेवक व आरपीआय नेते सुरज बनसोडे*

Post a Comment

0 Comments